Crime: नवऱ्याकडून विश्वासघात, बसमध्ये बसलेल्या बायकोला उचकी आली आणि संपलं तिचं आयुष्य, शेवटचे 'ते' तीन शब्द बेतले जीवावावर... जाणून तुम्हाला देखील बसेल मोठा धक्का.. या प्रकरणामुळे महिलेच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर
2024 मध्येच रिता हिच्या वडिलांचे देखील निधन झालं आहे. तेव्हा देखील रिता माहेरी आली होती. तेव्हा देखील रिता आणि तिच्या पतीमध्ये वाद झाले होते. तेव्हा सुद्धा रिता हिला माहेरी सोडून तिचा नवरा निघून गेला होता. अशात रिता देखील आई आणि भावासोबत दिल्लीत आली.
आई गुड्डी यांनी घडलेली सर्व घटना पोलिसांना सांगितली आहे. रिता हिच्या नवऱ्याच्या फोनवरून एका महिलेने तिला फोन केला. तेव्हा रिता आणि आई बसमध्ये होते. पतीचा फोन म्हणून रिता हिने फोन रिसीव्ह केला. तेव्हा तिच्या कावावर असं काही आली, ज्यामुळे ती ढसाढसा रडू लागली…
पुढे आईने लेकीला विचारलं काय झालं. तेव्हा रिता रडत म्हणाली, एका महिलेचा फोन होता, म्हणाली, ‘तुझी सवत बोलतेय… आता सासरी कधीच येऊ नकोस…’ हे सांगताना रिता हिला एक उचकी आली आणि तिचं निधन झालं… आता रिता हिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. महिलेच्या मृत्यूनंतर आईवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तर याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत
0 Comments