उमरखेड तालुक्यातील ग्रामीण भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निंगनूर अंतर्गत नागेशवाडी येथील अंकुश भाऊ राठोड शिवसेना उप तालुका प्रमुख तथा माजी उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य. निंगनूर त्यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा नागेशवाडी ( निंगनूर ) येते सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वह्या पेन चॉकलेट वाटप करण्यात आले अंकुश राठोड यांच्या वाढदिवसानिमित्ताने दरवर्षी वेगवेगळे कार्यक्रम ते करत असतात त्यानि सतत तीन वर्ष वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करण्याचे ठरवले होते मागील तीन वर्षांमध्ये अनेक वृक्षाचे रोपण केले अंकुश राठोड यांचे कार्य गोरगरीब लोकांच्या अडचणी मध्ये ते नेहमी धाव पळ करत असतात निंगनूर ग्रामपंचायत उपसरपंच असताना त्यांनी निंगनूर गावामध्ये व वाड्या मध्ये विकास कामे मोठ्या प्रमाणात केली निंगनूर व परिसरातील जनतेचा समस्या सोडविण्यासाठी ते नेहमीच तत्पर असतात त्यांनी 11 वेळेस रक्तदान करून परिसरातील तरुण युवकांना रक्तदान करण्यास ते आव्हान करत राहतात
ते निंगनूर सर्कल मधील शेतकऱ्यांचे पीक कर्जाचे समस्या गोरगरीब जनतेचे श्रावण बाळ योजनेचे निराधारांचे सर्वांच्या समस्या सोडविण्याचे प्रयत्न करत राहतात त्यांनी अनेक शेतकऱ्यांचे कामे माननीय पालकमंत्री संजय भाऊ राठोड यांच्या सहकार्यामुळे करून घेतात. काल जिल्हा परिषद शाळेमध्ये मा. प्रवीण पाटील मिरासे शिवसेना तालुकाप्रमुख तथा माजी सभापती व प्रल्हाद नाईक यांच्या हस्ते वह्या पेन व चॉकलेट वाटप करून अगदी सोप्या पद्धतीने आपला वाढदिवस जि. प शाळा नागेशवाडी येथे साजरा केला
0 Comments