प्रतिनिधी :-संजय जाधव यवतमाळ: दिनांक ३० जून शुक्रवारला बिटरगाव( बू) पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार प्रताप भोस अतिश जारंडे, नरेंद्र खामकर सतीश चव्हाण यांना भावपूर्ण वातावरणात निरोप ढाणकी शहरातील पोलीस चौकी येथे कार्यक्रमांमध्ये देण्यात आला .या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान हे उमरखेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाडवी हे होते.
निरोप समारंभाच्या कार्यक्रमावेळी गावातील प्रतिष्ठित मान्यवर , जनसामान्य,व पत्रकार बांधव उपस्थित होते. प्रथम उपस्थित असलेल्या मान्यवरांनी ठाणेदार प्रताप भोस व पोलीस कर्मचारी यांचा पुष्पगुच्छ ,हार व शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला व गेल्या अनेक दिवसांपासून होमगार्ड म्हणून कार्यरत असलेले बालमुकुंद महाजन व सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत हानवते यांना सेवानिवृत्ती पर सत्कार करण्यात आला. मान्यवरांनी बिटरगाव पोलीस स्टेशन येथे प्रताप भोस हे येथे रुजू झाल्यापासून ते आत्तापर्यंतच्या सहवासातील आपल्या सद्भावना व्यक्त केल्या.
प्रताप भोस हे धाडसी, साहशी, चातुर्य, असे चानाक्ष वृत्ती ही त्यांच्यात अंगी ठासून भरली होती व बिटरगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या सर्व भागातील मटका ,जुगार ,अवैध दारू, सिंधी विक्री करणाऱ्यान वर कारवाईचा बडगा उगारला व सर्व अवैध धंद्यावर मात करून ढाणकी व परिसरात सुख समृद्धीचे दिवस आणले कित्येक कुटुंब अवैध धंद्यामुळे उद्ध्वस्त होत होते. त्यावर ठाणेदार भोस यांनी चांगलाच वचक निर्माण केला होता. अनेक कुटुंब उध्वस्त होत होती ती आज सावरली त्याच कुटुंबातील अनेक त्यांचे नातेवाईक आई-वडील भाऊ बंधू साहेबांना निरोप देण्यासाठी आले होते. साहेबांनी त्यांच्या कार्यकिर्दी मध्ये अनेक चोऱ्यांचे प्रमाण वाढले होते त्यावर प्रताप भोस यांनी कंबर कसून चोऱ्या व डकायत करणाऱ्यांना पकडून जेरबंद केले. चोरट्यांनी एवढी दहशत माजवली होती की, शेतकरी शेतात काम करणारा मजूरदार रात्री रखवाली करण्यासाठी जाण्यास धजावत नव्हता. चोरट्यांचा धुमाकूळ एवढा वाढला होता की चोरी करून मारहाण व आत्मघात की हल्ले सुद्धा होत होते .ठाणेदार प्रताप भोस यांनी चोरट्यांना जेरबंद करून नागरिकांना भयमुक्त केले. त्यांच्या छोट्याशा अर्थातच दोन वर्षाच्या कालावधीत आपल्या कर्मातून त्यांच्या नावात जो प्रताप आहे तो त्याप्रमाणे कामाचा प्रताप घडविला .दोन वर्षाच्या कार्यकाळात अनेक व्यक्ती सोबत ऋणानुबंध जुळले होते बंधू भाऊ मित्र या प्रमाणे ठाणेदार प्रताप भोस यांचा कार्यकाळ समाप्त झाला येथून साहेब यवतमाळ येथे आपला पदभार सांभाळणार त्यामुळे एकीकडे उपस्थित असलेल्या जनसमुदायाने शुभेच्छा दिल्या तर दुसरीकडे पानावलेल्या डोळ्यांनी व जड अंतकरणाने बिटरगाव पोलीस स्थानकाचा पदभार सोडत असल्यामुळे व प्रताप भोस यवतमाळ येथे पदभार सांभाळणार त्यामुळे त्यांना निरोप देण्यात आला त्यांच्या कारकीर्दीमध्ये मोलाची साथ लाभली ती म्हणजे बीट जमादार मोहन चाटे , आतिश जारंडे गजानन खरात ,दत्ता कुसराम ,व संपूर्ण चम्मू चे त्यामुळे संपूर्ण पोलीस स्टॉप चे डोळे सुद्धा पाणावलेले दिसत होते.प्रताप भोस साहेबांनी आतापर्यंत गावातील सर्व पत्रकार बांधव व प्रतिष्ठित नागरिक यांनी जे प्रेम दिले ते अविस्मरणीय राहील. मी इथून गेलो तरी आपल्या आठवणी सदैव माझ्या जीवनात सतत साठवून राहतील.त्यामुळे माझे साहस नक्कीच वाढेल व प्रत्येक आव्हान पेलण्याची ताकत येईन असे प्रतिपादन यावेळी भोस साहेबांनी केले तर सूत्र संचलन संतोष तिरमकदार यांनी केले.
0 Comments