-->

Ads

निराधार वृद्ध गृहस्थाचे कोलमडलेले घर जिजाऊने दिले बांधून

 पडघा – भिवंडी : मागील महिन्यात वादळी वाऱ्यामुळे पडघा विभागातील अनेक घरांचे मोठे नुकासान झाले होते. यात अनेक घरांचे पत्रे उडाले तर अनेक घरांची मोठ्या प्रमाणात वाताहत झाली होती . यात पत्रे उडालेल्या अनेक घरांना जिजाऊ कडून पत्रे वाटप करण्यात आले होते. याच पडझडित पडघा विभगातील वाफाले गावातील ८४ वर्षीय वृद्ध गृहस्थ सरावण्या पवार यांचे राहते घर हे देखील या वादळी वाऱ्यात पुर्णपणे जमीनदोस्त झाले होते. जिजाऊला संस्थेला याबाबत माहिती मिळताच जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून त्यांचे हे घर बांधून देण्यात आले आहे . तर आज दिनांक ३० जून रोजी सायंकाळी ५ वा . या आजोबांना हे घर संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आले.


मागील महिन्यात वादळी वाऱ्यात वृद्ध आणि निराधार असलेल्या सरावण्या पवार  यांचे घर हे पूर्णतः  कोलमडले होते.  हे  घर पुन्हा उभे करणे त्यांना शक्य नव्हते . याबाबतची माहिती जिजाऊ शैक्षणिक आणि समाजिक संस्थेला समजताच संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांनी या ठिकाणी भेट दिली व वयोवृद्ध असलेल्या सरावण्या पवार यांना शब्द दिला की १५ दिवसांतच आपण तुमचे घर पुन्हा नव्याने बांधून देऊ . दिलेला शब्द पाळत जिजाऊ संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांनी आज बांधून पूर्ण झालेले हे घर वृद्ध गृहस्थ सरावण्या पवार यांना सुपूर्द केले आहे. या घराचा गृहप्रवेश कार्यक्रम निलेश सांबरे यांच्या शुभहस्ते पार पडला . यावेळी या गावातील ग्रामस्थांसह तालुक्यातील अनेक गावांनी जिजाऊच्या या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले आहे. तर यावेळी आपले कोलमडलेले घर पुन्हा छान पद्धतीने बांधून उभे राहिल्याचे पाहून वृद्ध सरावण्या पवार यांच्या डोळ्यांच्या कडा आनंदाने ओलावल्या होत्या . तर या आजोबांची पुढील उदर निर्वाहासाठी जिजाऊ संस्था त्यांच्या सोबत असेल अश्या भावना यावेळी संस्थापक सांबरे यांनी व्यक्त केल्या .


तर या आधीही १५  दिवसांपूर्वीच जिजाऊ संघटनेच्या माध्यमातून निवडून आलेल्या डहाणू तालुक्यातील कंक्राडी- नंदारे ग्रामपंचायतच्या सरपंच रुपाली कोकेरा या आपल्या मोडक्या तोडक्या कुडाच्या शेणा मातीच्या घरातून सरपंच पदाची धुरा सांभाळत गाव विकासाचा गाडा हाकत असल्याचे समजतात जिजाऊ संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांनी प्रत्यक्ष या गावात भेट देऊन पाहणी करून सरपंच रुपाली कोकरा यांच्या  प्रामाणिकपण कार्याची दखल घेत  सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीकोनातून  त्यांना पक्के घर बांधून दिले.  मी फार काही मोठे कार्य करत नसून ईश्वराने मला इतरांना देण्याचे हात दिले आहेत  मी केवळ माझी भूमिका पार पाडतोय  आणि हे करताना मला समाधान मिळते . आपल्यातला माणूस जिवंत असण्याची लक्षणे आहेत . प्रत्येकाने आपल्या परीने जसे जमेल तसे हे माणूसपण जपत आपल्या समाजबांधवांना सहकार्य केले पाहिजे . असे देखील सांबरे याप्रसंगी म्हणाले .




Post a Comment

0 Comments