-->

Ads

फुलसावंगी येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी स्वप्नील नाईक यांची तर उपअध्यक्षपदी संतोष व्यवहारे यांची बिनविरोध निवड करण्यात आली



 फुलसावंगी ( दि१८ ) २ एप्रिल ला पार पडलेल्या सह संस्थेच्या निवडणुकीत येथील  विशाल नाईक आणि स्वप्नील नाईक  याच्या पॅनल ने १३ पैकी १३  जागेवर विजय मिळवून  फुलसावंगी विविध कार्यकारी सह सोसायटी रजि नं ९०९  वर पुन्हा एकदा काँग्रेस प्रणित  नाईक पॅनल चा झेंडा फडकविला  गेला आहे १३ जागांसाठी एकूण २७ उमेदवार रिंगणात होते नाईक पॅनल च्या १३ आणि महाजन पॅनल च्या १३ आणि एक अपक्ष असे २७ उमेदवार निवडणूक रिंगणात होते , नाईक आणि महाजन पॅनल मध्ये  खरी चुरशीची लढत होती या निवडणुकीत महाजन पॅनल चा  सुपडा साफ करून नाईक पॅनल ने  एकहाती सत्ता काबीज केली

                   महागाव तालुक्यातील सर्वात मोठी असलेली फुलसावंगी सोसायटीची निवडणूक काल  पार पडली या निवडणुकीत एकूण सात गावातील सभासदांनी मतदानाचा हक बजावला या मध्ये २००१ पैकी ८२० मतदान झाले असून यात सर्वात जास्त मत नाईक पॅनल ला मिळाली असून नाईक पॅनल चा विजय झाला आहे.या सोसायटीत सात गावांचा समावेश असून ईसापूर,चिंचोली, चिल्ली, पिंपळगाव, वडद,काळी असे एकूण सात गावे आहे.

            आज अध्यक्ष व उपअध्यक्षा ची निवड पार पडली त्यात स्वप्नील नाईक अध्यक्ष तर संतोष व्यवहारे उप अध्यक्ष पदी बिनविरोध निवड करण्यात आली.

           यावेळी उपस्थित असलेले नवाब जानी कमर बेग,दिनेश नाईक,कयाम नवाब,विशाल नाईक,गजानन प्रतापवार,इरफान कुंदन ,बाबुराव व्हडगीरे,इमरान पठाण,शमी पठाण,बंटी पठाण,शेख हमीद,उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments