-->

Ads

अजितदादांच्या स्क्रिप्टचे रायटर फडणवीस; अंधारेंच्या गौप्यस्फोटानं खळबळ

 

ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पुन्हा एकदा शिंदे, फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.अजित पवारांच्या मुद्द्यावरून त्यांनी शिंदे गटाला लक्ष्य केलं आहे.

  मुंबई, 19 एप्रिल : ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पुन्हा एकदा शिंदे, फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. अजित पवारांच्या मुद्द्यावरून त्यांनी शिंदे  गटाला लक्ष्य केलं आहे. अजित पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शिंदे गटाचे लोक उघडले पडले आहेत. राज्यात सध्या सुरू असलेल्या घडामोडीवर शिंदे गटाचे स्टेटमेंट पहाता शिंदे गटाचे लोक तंबाखूचा बार भरून बोलतात असं वाटत असल्याचा टोला अंधारे यांनी लगावला आहे.

  ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पुन्हा एकदा शिंदे, फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.अजित पवारांच्या मुद्द्यावरून त्यांनी शिंदे  गटाला लक्ष्य केलं आहे. अजित पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शिंदे गटाचे लोक उघडले पडले आहेत. राज्यात सध्या सुरू असलेल्या घडामोडीवर शिंदे गटाचे स्टेटमेंट पहाता शिंदे गटाचे लोक तंबाखूचा बार भरून बोलतात का असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

  अजित दादांची स्क्रिप्ट भाजपनं लिहीली 

  पुढे बोलताना त्यांनी म्हटलं की, अजित दादांची स्क्रिप्ट भाजपकडून लिहली गेली आहे. देवेंद्र फडणवीस हे स्क्रिप्ट रायटर आहेत. फडणवीसांचं मौनच सगळं सांगून जातं. वज्रमूठ सभेला मिळणाऱ्या प्रतिसदानंतर भाजपकडून हे सर्व केलं जात आहे. मात्र महाविकास आघाडी अभ्यद्य आहे, आम्ही सर्व निवडणुका एकत्र लढणार असल्याचं अंधारे यांनी म्हटलं आहे. दरम्यान महाराष्ट्र भूषण पुरस्कारात जे मृत्यू झाले ते उष्मघातामुळे नाही तर चेंगराचेंगरीमुळे झाल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात येत आहे. मात्र हे मृत्यू चंगेराचेंगरीमुळे नाही तर असुविधेमुळे झाल्याचे सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे.

  Post a Comment

  0 Comments