-->

Ads

उन्हाळ्यात पावसाचे सर्जिकल स्ट्राईक, या जिल्ह्यात वादळी पावसाचा येलो अलर्ट

 

महाराष्ट्रात मागच्या चार दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पाऊस होत आहे.




मुंबई, 17 मार्च : महाराष्ट्रात मागच्या चार दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पाऊस होत आहे. यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाचे अलर्ट देण्यात आले आहेत. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. पुढचे 48 तास राज्यातील वातावरण असेच राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्यात विविध भागात मागच्या दोन दिवसांपासून झालेल्या पावसाने शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

राज्यातील कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात जोरदार पाऊस होणार आहे. तर मध्य महाराष्ट्रातील  नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या भागातही पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालनाबीड, परभणी, हिंगोली, नांदेड, धाराशिव, लातूर, या भागात गारांचा पाऊस होण्याची शक्यात आहे. 


विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम. यवतमाळ, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जोरदार पावसाची शक्यता आहे. ढगाळ हवामान असल्याने पुढील काही दिवस राज्यात पावसाची शक्यता आहे. आज (ता. 17) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात विजांसह वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

ढगाळ हवामान, पावसाळी वातावरणामुळे कमाल तापमानात चढ-उतार होत आहे. कोकणातील उष्ण लाट निवळली आहे. दरम्यान मागच्या 24 तासांमध्ये ब्रह्मपुरी येथे देशातील उच्चांकी 38.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उर्वरित राज्यात बहुतांशी ठिकाणी कमाल तापमान 33 ते 38 अंशांच्या दरम्यान होते.

राज्याील मागच्या 24 तासांत विविध शहरात पुणे 34.3 (18.6), जळगाव 36.4 (16.8), धुळे 36 (16), कोल्हापूर 35.3 (20.7), महाबळेश्वर 29.1 (15.8), नाशिक 32.5 (17), सांगली 35.6 (18.7), सातारा 35.6 (17.7), सोलापूर 37.9 (23.7), डहाणू 34 (23.2), रत्नागिरी 32.4 (24.6), छत्रपती संभाजी नगर  29.2 (16.1), नांदेड 35.8 (21.6), परभणी 34 (18.8).

अकोला 34.2 (18.1), अमरावती 35 (16.3), बुलडाणा 32 ( 17.2), ब्रम्हपूरी 38.2 (22.6), चंद्रपूर 35.4 (22.8), गडचिरोली 32.4 (18), गोंदिया 35 (22.4), नागपूर 35.3 (21.4), वर्धा 35.5 (21.9), वाशिम 37.6 (19.8), यवतमाळ 36.2 (19.6) तापमानाची नोंद झाली.

Post a Comment

0 Comments