-->

Ads

मोठी बातमी! महिलांना आजपासून एसटीच्या भाड्यात 50 टक्के सूट, नवे नियम लागू !

 

राज्यातील महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. आजपासून त्यांना राज्य परिवहन महामंडळाच्या कोणत्याही बसमध्ये पन्नास टक्के भाड्यात प्रवास करता येणार आहे.




    मुंबई, 17 मार्च : राज्यातील महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. आजपासून त्यांना राज्य परिवहन महामंडळाच्या कोणत्याही बसमध्ये पन्नास टक्के भाड्यात प्रवास करता येणार आहे. आजपासून ही योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेची घोषणा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात केली होती. ही योजना आजपासून लागू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाकडून एक परिपत्रक काढून या योजनेची माहिती देण्यात आली आहे.

    काय म्हटलं आहे परिपत्रकात? 


    महाराष्ट्र राज्याच्या सन. 2023-24 च्या अर्थसंकल्पामध्ये महिलांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेसच्या तिकीट दरात 50 टक्के सवलत देण्याची घोषणा करण्यात आली होती. त्या अनुषंगाने दिनांक 17 मार्च 2023 पासून एसटी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेस मधून महिलांना तिकीट दरात 50 टक्के सवलत देण्याची योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेला एसटी महामंडळाच्या स्तरावर महिला सन्मान योजना म्हणून ओळखले जाईल. या योजनेची प्रतिपुर्ती रक्कम शासनाकडून महामंडळाला मिळणारं आहे.

    Post a Comment

    0 Comments