-->

Ads

महिला कपडे बदलायच्या 'तो' खिडकीच्या फटीतून VIDEO करायचा, मुंबईतून तीन जण अटकेत


  छुप्या कॅमेऱ्याने महिलांचे कपडे बदलताना, अंघोळ करतानाचे फोटो आणि व्हिडीओ शूट करून त्यांना भरीस पाडणाऱ्या टोळीचा पोलिसांनी सापळा लावून पर्दाफाश केला आहे. ही टोळी खिडक्या किंवा दारांच्या फटीतून छुप्या पद्धतीने व्हिडीओ शूट करायचे. मुंबईतील शिवडी परिसरात ही धक्कादायक घटना समोर आली आहे. शिवडी पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.

झुग्गी वस्तीत राहणाऱ्या महिलांचे आरोपी छुप्या कॅमेऱ्याने कपडे बदलताना, अंघोळ करतानाचे व्हिडीओ शूट करायचे. ते व्हिडीओ पेनड्राईव्हमध्ये ठेवायचे. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी चार महिलांचे नको ते फोटो पोलिसांनी आरोपींकडून ताब्यात घेतले आहेत.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार पीडित महिलांची संख्या जास्त असण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलीस या प्रकरणी चौकशी करत आहेत. सतीश हरिजन, सरावना हरिजन आणि स्टीफन नाडर अशी अटक केलेल्या आरोपींची नाव आहेत. हे तिन्ही आरोपी दार, खिडक्या आणि इतर ठिकाणांहून महिलांचे फोटो, व्हिडीओ काढायचे आणि नंतर पेन ड्राईव्हमध्ये ठेवायचे.

मुंबई पोलिसांच्या डीसीपी गीता चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या महिलांचे अश्लील व्हिडीओ आरोपींकडून जप्त करण्यात आले आहेत त्यांची नोंद 2019-20 मध्ये करण्यात आली आहे. परस्पर भांडणातून तिचा अश्लिल व्हिडीओ रेकॉर्डिंग झाल्याची माहिती पीडितेला मिळाल्याने हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं.
महिलेने याबाबत अधिक माहिती घेतली असता, तिच्यासोबत परिसरातील अनेक महिलांचे कपडे बदलतानाचे ते व्हिडीओ बनवण्यात आल्याचे समोर आले. त्यानंतर ही बाब शिवडी पोलिसांना कळवण्यात आली. प्राथमिक तपासानंतर पोलिसांनी आयपीसी आणि आयटी कायद्यांतर्गत एफआयआर नोंदवून आरोपीला अटक केली.

आरोपींकडून अश्लील व्हिडीओही जप्त करण्यात आले आहेत. आरोपी सध्या दावा करत आहेत की त्यांनी हा व्हिडिओ स्वतः पाहण्यासाठी रेकॉर्ड केला होता पण पोलिस तो व्हिडिओ इतर लोकांना आणि पॉर्न वेबसाइटवर पाठवला आहे का याचा तपास करत आहेत. आरोपींनी व्हिडिओची धमकी देऊन महिलांना ब्लॅकमेलही केले आहे का, याचाही शोध सुरू आहे.


Post a Comment

0 Comments