-->

Ads

VIDEO : महामार्गावर वाहतूक पोलिसांची हप्तेगिरी, धक्कादायक प्रकार कॅमेऱ्यात कैद

 


वाहतूक पोलिसांच्या लुबाडण्याचे अनेक प्रकार याआधी उघड झाले आहेत. अशा वाहतूक पोलिसांवर कायदेशीर देखील कारवाई करण्यात आलेली आहे. पण तरीही काही वाहतूक पोलीस कर्मचारी यातून काहीच शिकताना दिसत नाहीयत. ते सर्रासपणे हप्ता मागतात. त्यांच्या मुजोरीला सर्वसामान्य माणूस मेटाकुटीला आलेला असतो. सर्वसामान्य नागरिक अशा भ्रष्टाचारी वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांना आपल्याकडे तितके पैसे नाहीत म्हणून विनवणी करतात. पण तरीही ते ऐकत नाहीत आणि जास्त पैसे वसूल करण्याची धमकी देत नागरिकांना लुबाडतात. वाहतूक पोलिसांच्या याच मुजोरीचा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. उस्मानाबादमध्ये हप्ता मागणारा वाहतूक पोलीस कर्मचारी कॅमेऱ्यात अचूकपणे कैद झाला आहे.

वाहतूक पोलिसांची हप्तेगिरी काही महाराष्ट्राला नवीन नाही. मात्र उस्मानाबाद-लातूर रोडवर एक वाहतूक पोलीस वाहन चालकाला हप्ता मागतान कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. बार्शी तालुक्यातील अस्लम जानूर शेख आपल्या वाहनात शेळ्या घेऊन लातूरकडे चालला होता. उस्मानाबाद - लातूर हद्दीवर पोलिसांनी त्याची गाडी आडवली. त्याच्याकडे पैशांची मागणी केली. खटला दाखल केला तर चार हजार दंड होईल. प्रत्येक शेळीचे 10 रुपये पैसे दे, अशी मागणी केली.

Post a Comment

0 Comments