गाडीनं वेग पकडल्यामुळे या प्रवासी मधल्यामध्ये अडकला गेला होता. त्याचा तोल जाऊन प्लॅटफॉर्म पूर्णपणे फरफटत गेला.
कल्याण : धावत्या रेल्वेखाली पडलेल्या प्रवाशाला सुरक्षित बाहेर काढण्यात यश आलंय. ही थरारक घटना सीसीटीव्ही (Shocking CCTV Video) कॅमेऱ्यात कैद झाली. एक प्रवासी रेल्वे खाली येता येता थोडक्यात बचावला. कल्याण रेल्वे स्थानकात ही घटना घडली. धावती गाडी पकडण्याच्या प्रयत्न हा प्रवासी करत होता. मात्र या प्रवाशाचा धावती गाडी (Running Express Train) पकडण्याचा प्रयत्न फसला. तोल जाऊन हा प्रवाशी प्लॅटफॉर्म (Railway Platform) आणि गाडीच्या मधल्या जागेतून गाडीखाली येतो की काय, अशी भीती होती. मात्र इतक्यात या प्रवाशावर रेल्वे स्थानकातील सुरक्षा बलाच्या जवानाची आणि एका महिला पोलिसाची नजर पडली. पोलिसांनी तत्काळ या प्रवाशाच्या दिशेनं धाव घेतली. या प्रवाशाच्या जीव महाराष्ट्र सुरक्षा दलातील जवानाच्या प्रसंगावनधानामुळे थोडक्यात बचावला आहे.
0 Comments