श्री जांबमुनी सामाजिक संस्था अंबरनाथच्या वतीने १४ एप्रिल रोजी परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती अंबरनाथ पश्चिम येथील गावदेवी चौक जवळील श्री सद्गुरु सिद्धारूढ स्वामी भाविक मंडळ मठाचा प्रांगणात साजरी करण्यात आली. डॉ.बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष श्री विकास कानडे, श्री सरोदे सर, (बहुजन संबोदक) श्री एच. आर. चलवादी सर (सेवानिवृत्त मुख्याध्यापक) आणि समाजातील इतर ज्येष्ठ महिला नागरिकांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. सरोदे सरांनी आपल्या भाषणात स्वतःचा, समाजाचा व राष्ट्राच्या उन्नतीसाठी शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या उच्च पात्रतेवर प्रकाश टाकून ते म्हणाले की बाबासाहेबांना समजून घेण्यासाठी त्यांची पुस्तके वाचली पाहिजेत, आपण खूप संघर्षातून गेलो होतो, पूर्वीच्या काळी त्यांचा खूप अपमान झाला होता पण तरीही संयमाने अतिशय मेहनतीने अभ्यास केला आणि संपूर्ण जगाला प्रेरित केले. प्रत्येक घरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले पाहिजे असे प्रतिपादन केले. गरिबीची आणि हालाखीची परिस्थिती असली तरीही मुला मुलींना शिक्षण द्यावा असे समाजाच्या लोकांना प्रेरित केले.
श्री एच आर चलवादी सर यांनी वर्ण प्रणालीवर भाषण केले आणि दलितांचा अपमान आणि पुणे करार, महात्मा गांधी आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्यात मतभेद असलेल्या काही मुद्द्यांवरही त्यांनी प्रकाश टाकला आणि काही घटनांमध्ये बाबासाहेबांना लोकांच्या कल्याणासाठी आणि लोकांच्या सुरक्षेसाठी तडजोड करावी लागली असे मत मांडले. श्री जांबमुनी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष श्री विकास कानडे यांनी समाजातील लोकांनी संघटित होऊन प्रत्येक मुला मुलींचा अभ्यास घट्ट करावा असे आवाहन केले. आणि टीव्हीतले सास बहू सीरियल पाहणे बंद करावे. जिजामाता, सावित्रीबाई फुले, रमाबाई आंबेडकर आहिल्याबाई होळकर आणि महाराष्ट्र आणि भारतातील इतर समाजसुधारकांच्या मालिका पाहण्याचा व त्यांचे पुस्तके वाचण्यावर आग्रह धरला. देवाने फक्त जन्म दिला आहे पण स्वतःला कसे जगवायचे आणि विकसित करायचे हे स्वतःवर अवलंबून आहे हे देखील त्यांनी ठळकपणे सांगितले. शिक्षित व्हा, संघटित व्हा आणि संघर्ष करा हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अवतरणही लक्षात ठेवा असे ते म्हणाले. कु. हर्षत वेंकटेश पटनम यांनी बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनावर उत्कृष्टरित्या भाषण दिले. संस्थेच्या वतीने समाजातील ज्येष्ठ नागरिक, नोकरदार, कलाकार वकील, शिक्षक, उच्चशिक्षित लोकांचे सत्कार करण्यात आला. श्री मारेप्पा महाराज, श्री सिद्धरुढ स्वामी भाविक मंडळ चे माठाधीश व भजनमंडळीचे विशेष आभार मानण्यात आले.
राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेच्या सचिव श्री नरसिंह म्हात्रे यांनी केले, कार्यक्रमास उपस्थित सर्व समाज बांधवांसाठी भोजनाची व्यवस्था संस्थेद्वारे करण्यात आली होती. कार्यक्रमाला मोलाचे योगदान कार्यकारणी समितीचे
उप अध्यक्ष -श्री. परदेसी बैनी
उप अध्यक्ष - श्री. चिंतल खाडे
उप सचिव - श्री. के.हनुमंता सर
खजिनदार -श्री.सोमुगोपाल म्हेत्रे
उप खजिनदार - श्री. शंकर पाटीमेदी
सभासद :
श्री. मल्लेश येमनोलु
श्री. रमेश कोमर
श्री. बाबु भोसके
श्री. संदीप चव्हाण
श्री. सूर्यप्रकाशक
श्री. शंकर मिसे
श्री गुरुनाथ शावणे
श्री.शंकर लक्ष्मय्या
श्री. परशुराम बैनीयांनी दिले.

0 Comments