-->

Ads

धक्कादायक! मावशीने भाचीला गुंगीचे औषध देत बनवला आक्षेपार्ह व्हिडीओ आणि मग..., भंडाऱ्यातील घटनेने खळबळ

 

Bhandara news: भंडारा जिल्ह्यातील साकोली येथे हा धक्कादायक प्रकार घडला आहे. एका महिलेने आपल्या भाचीला गुंगीचं औषध देत तिचा आक्षेपार्ह व्हिडीओ बनवला आहे.



    भंडारा, 5 एप्रिल : "माय मरो पन मावशी जगो" अशी मावशीची महती सांगणारी म्हण आपन नेहमी एकत असतो, पण भंडाऱ्यात (Bhandara) एक धक्कादायक घटना घडली आहे. भंडाऱ्यातील मावशीने नात्यातील सर्व सीमा पार केल्या आहेत. चहात गुंगीचे औषध टाकून भाचीला बेशुद्ध करून एका मुलाच्या साह्याने आक्षेपार्ह व्हिडीओ मावशीने बनवल्याचा प्रकार (aunty made niece obscene video) समोर आला आहे. इतकंच नाही तर हा व्हिडीओ बनवून भाचीला ब्लॅकमेल करण्यात येत होते. भंडारा जिल्ह्यात साकोली (Sakoli area of Bhandara) येथे ही घडना घडली आहे.

    धक्कादायक म्हणजे ज्या मुलाने व्हिडीओ शूट केला तो आरोपी गेल्या एक वर्षापासून पीडित मुलीचे लैंगिक शोषण करत असल्याची माहिती समोर आली आहे. पीडित मुलीने तक्रार दिल्यानंतर शोषण करणाऱ्या मुलाला आणि मावशीला साकोली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 25 वर्षीय गोवर्धन बावनकुळे असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. आरोपी हा लाखनी तालुक्यातील शिवनी मोगरा येथे राहणारा आहे.

    संबधित पीडित मुलगी ही गोंदिया जिल्ह्यातील असून एक वर्षापूर्वी मार्च 2021 मध्ये पीडित मुलगी आणि तिची आई साकोली तालुक्यातील एका गावात चुलत मावस बहिणीकडे विवाह समारंभाकरिता आली होती. समारंभ आटोपल्यानंतर दोघेही मुक्कामी थांबले, त्यावेळी चुलत मावशीने पीडितेला चहा दिला आणि तिला साड्या पाहण्याकरिता बोलाविले. काही क्षणातच पीडित मुलीला चक्कर आली आणि काही वेळानंतर मुलगी उठली तेव्हा तिच्या अंगावर एकही कपडा नव्हता.


    या घटनेनंतर पीडित मुलीने आपल्या मावशीला विचारले असता, मावशीने तिला आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडीओ दाखविले. तसेच कोणाला सांगू नकोस, अशी दमदाटी केली. त्यानंतर वर्षभर हा सर्व प्रकार सुरू राहिला. दरम्यान ज्या मुलाने मोबाइलमध्ये फोटो आणि व्हिडीओ तयार केला त्याने हे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत होता. तसेच ही धमकी देत तो पीडित मुलीला वारंवार फोन करून तिच्या गावी जाऊन तिचे शोषण करत होता.

    मागील महिन्यात पीडित मुलीच्या गावी पुन्हा एक लग्न समारंभ असल्याने सर्व नातेवाईक तेथे आले. त्यावेळी मावशीने मुलीला बाहेर चौकात फिरायला नेले त्यावेळी हा सर्व प्रकार उघडकीस आला. पीडितेच्या आई-वडिलांना या सर्व प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तत्काळ साकोली पोलीस स्टेशन गाठत पोलिसांनी पीडिता आणि तिच्या पालकांच्या तक्रारीवरून आरोपी मुलगा, तिच्या मावशीविरोधात 376, 354, 328, 506 कलमांनुसार गुन्ह्याची नोंद केली आहे. दोन्ही आरोपींना अटक केली असून साकोली पोलीस पुढील तपास करीत आहे.

    Post a Comment

    0 Comments