मारहाण आणि हत्येच्या अनेक घटना दररोज आपण ऐकत किंवा वाचत असतो. मात्र, काही घटना अशा असतात, ज्याबद्दल ऐकूनच कोणीही चक्रावून जाईल. सध्या उत्तर प्रदेशातील रायबरेली येथून एक अशीच धक्कादायक घटना समोर आली आहे. यात एका व्यक्तीने आपल्या आजोबांवर फावड्याने वार केले आणि त्यांचा जीव घेतला (Grandson Killed His Maternal Grandfather). काहीतरी वाद झाल्यानंतर आजोबांनी आपल्या नातवाच्या कानशिलात लगावली होती. याच कारणामुळे नातवाचा पारा चढला होता आणि तो आजोबांवर नाराज होता.
आजोबा शत्रोहन पाल यांच्या हत्येचा आरोप असलेला सतीश हा रायबरेलीच्या महाराजगंज पोलीस स्टेशन परिसरात राहणारा आहे. 20 मार्च रोजी शत्रोहन रात्रीच्या वेळी त्यांच्या शेतावर पहारा देण्यासाठी गेले असता त्यांची हत्या करण्यात आली. त्यांना फावड्याने वार करत निर्घृणपणे ठार मारण्यात आलं.
घटनेची माहिती मिळताच पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला. पोलिसांच्या तपासात शत्रोहन पाल यांच्या नातवाने त्यांची निर्घृण हत्या केल्याचं निष्पन्न झालं. त्याने आपल्या आजोबांवर फावड्याने वार केले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शत्रोहन यांचा त्यांच्या नातवासोबत घराच्या भिंतीवरून काहीतरी वाद झाला होता. नंतर याच वादातून शत्रोहन यांनी आपला नातू सतीश याला कानशिलात मारली होती. सतीश हा आपला अपमान असल्याचं मानून संधी शोधत होता. 20 मार्चच्या रात्री सतीश फावडं घेऊन शेतात गेला आणि तिथे झोपलेले आजोबा शत्रोहन यांच्यावर वार करण्यास सुरुवात केली. सतीशने याचठिकाणी आजोबांची हत्या केली.
तपासात शत्रोहन यांची हत्या नातवानेच केली असल्याचं समोर येताच पोलिसांनी सतीशला अटक केली आहे. सध्या त्याची चौकशी सुरू आहे.
.jpg)
0 Comments