धक्का लागला म्हणून एका 29 वर्षीय तरुणाची पाच ते सहा जणांच्या जमावाने हत्या (murder) केल्याचा धक्कादायक प्रकार बदलापूर (badlapur) शहरात घडला. या हत्याने बदलापूर शहर पूर्णपणे हादरले आहे. या तरुणाला बेदम मारहाण करतांनाची सगळी दृश्य सीसीटीव्हीत कैद झाली आहेत.
बदलापूर पश्चिमेला नाईन सिज हे वाईन अँड डाईन नावाचे रेस्टॉरंट आहे. या ठिकाणी शनिवारी रात्री साडेअकराच्या सुमारास सिद्धांत सरोज आपल्या मित्रासोबत आला होता. याच वेळेस त्याच्या शेजारील टेबलवर चार ते पाच जण देखील बसले होते. यावेळी यातील एकाचा सिद्धांतला हाताचा कोपरा लागला. यावेळी सिद्धांतने त्याला व्यवस्थित बसण्याची विनंती केली. मात्र याचा राग आल्याने पाच ते सहा जणांच्या ग्रुपमधील एकाने सिद्धांतला रेस्टॉरंटमध्येच मारहाण करायला सुरुवात केली. यानंतर सिद्धांत रेस्टॉरंटच्या बाहेर पडताच पाच ते सहा जणांनी त्याला लक्ष करीत लाठ्या काठ्यांनी बेदम मारहाण करीत त्याची हत्या केली.
वर्दळीच्या रस्त्यात रात्री साडे अकराच्या सुमारास हा सगळा प्रकार होत असताना अनेक जण सगळा प्रकार बघत होते. मात्र एकानेही हे थांबण्याचा प्रयत्न केला नाही. दरम्यान या मारहाणीत सिद्धांतला शरीरावर अनेक ठिकाणी गंभीर जखमा झाल्याने त्याचा मृत्यू झाला.
याप्रकरणी बदलापूर पश्चिम पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी दोन संशयित त्यांना ताब्यात घेतले आहे.सीसीटीव्ही च्या आधारे आरोपींचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत रस्त्याच्या शेजारी पडलेल्या सिद्धांतला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले, त्याच्या शरीरावर अनेक ठिकाणी गंभीर दुखापत झाली होती.
दरम्यान, रेस्टॉरंटमधील सीसीटीव्ही ताब्यात घेतले असून या सीसीटीव्हीमधील मारहाण करणाऱ्या आरोपींची ओळख पटवून त्यांना अटक केली जाणार आहे. सध्या माहितीच्या आधारे दोन संशयितांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू असल्याचे बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता गावडे यांनी सांगितले आहे

0 Comments