-->

Ads

धक्कादायक! प्रियकराने लग्नासाठी नकार देताच प्रेयसीसह तिच्या 5 मैत्रिणींनीही प्राशन केलं विष, तिघींचा मृत्यू


 सध्या एका हादरवून सोडणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. यात एका युवतीचं एका तरुणावर प्रेम जडलं. तरुणीने आपलं प्रेम व्यक्त करत लग्नाचा प्रस्ताव त्याच्यासमोर ठेवला. मात्र तरुणाने लग्नास नकार दिला. यामुळे नाराज तरुणीने घरी येऊन विषारी पदार्थ खाल्ला. जेव्हा या तरुणीच्या पाच मैत्रिणी घरी पोहोचल्या तेव्हा तरुणीची ही अवस्था पाहून त्यांनीही विष प्राशन केलं या घटनेत तीन तरुणींचा मृत्यू झाला. ही घटना बिहारच्या औरंगाबाद जिल्ह्यातील आहे.

घटनेत तिघींचा मृत्यू झाला असून तिघींवर मगध मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहेत. या अविश्वसनीय घटनेने गावात एकच खळबळ उडाली. गावातील लोक हैराण झाले असून तरुणींच्या घरच्यांनाही मोठा धक्का बसला आहे. पोलिसांनी तिन्ही मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबाद जिल्ह्यातील कसमा पोलीस स्टेशन हद्दीतील चिरैला गावात हा भयानक प्रकार घडला आहे. यात 6 मैत्रिणींनी मिळून विषारी द्रव्य प्राशन करून जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान ३ जणींचा मृत्यू झाला, तर ३ जण गंभीर अवस्थेत मगध वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात उपचार घेत आहेत.

एसपी कांतेश कुमार मिश्रा यांनी सांगितलं की, मृतांमधील एका तरुणीचे तिच्या भावाच्या मेहुण्यासोबत प्रेमसंबंध होते. तिने आपल्या मैत्रिणींसमोर आपलं प्रेम व्यक्त करत त्याला लग्नासाठी विचारणा केली, मात्र त्याने लग्नास नकार दिला. प्रियकराने लग्नास नकार दिल्यानंतर सगळ्या मैत्रिणी गावी आल्या. नंतर त्यांनी पाहिलं की त्यांच्या मैत्रिणीने विष प्राशन केलं आहे. हे पाहून इतर मैत्रिणींनीही तिची साथ दिली आणि या सगळ्यांनी विष प्राशन केलं.

सहा तरुणींनी एकत्र विष प्राशन केल्याची घटना गावभर पसरली आणि गावात खळबळ उडाली. माहिती मिळताच गावकरी त्यांना वाचवण्यासाठी धावले, मात्र तोपर्यंत 3 मुलींचा मृत्यू झाला होता. उर्वरित 3 जणींना चांगल्या उपचारासाठी मगध वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आलं. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच सीओ अवधेश कुमार सिंग, एसएचओ राजगृह प्रसाद आदींनी घटनास्थळी पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला. एकाच वेळी तीन मुलींचा मृत्यू झाल्याने गावात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या सगळ्या मैत्रिणी गुरारू येथे गेल्या होत्या आणि तिथून आल्यानंतर त्यांनी विष प्राशन केलं. तीन मुलींच्या मृत्यूनंतर पोलिसांनी सर्वांचे मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत.

Post a Comment

0 Comments