बाबुराव काहालकर वय 68 वर्षे असे मृतकाचे नाव असून मंगेश काहालकर (वय 28 वर्षे) असे आरोपी मुलाचे नाव आहे. या प्रकरणी पालांदुर पोलिसांनी आरोपी मुलाविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंद केली आहे. तसेच आरोपी मुलगा मंगेश याला अटक केली आहे.
आरोपी मंगेश हा आपल्या आई वडिलांसोबत राहत होता. वडिलांचे मुलासोबत दारूच्या नशेत अनेकदा वाद होत असायचा. घटनेच्या दिवशी मृतक बाबूराव यांचे पत्नीसोबत जोरदार भांडण झाले. यात वडिलांनी आईला शिव्या देण्यास सुरुवात केली. यानंतर रागाच्या भरात मंगेश याने आपल्या वडिलांना लाकडी दांडयाने मारहाण केली.
लाकडी दांडक्याने केलेल्या हल्ल्यात वडील गंभीर जखमी झाले आणि त्यांचा घटनास्थळी मृत्यू झाला. या घटनेत फिर्यादी आरोपीच्या आईच्या जबाबावरुन पालांदूर पोलीस ठाण्यात कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आरोपी मुलाला अटक करण्यात आली आहे. या घटनेने खराशी गावात खळबळ उडाली आहे.
कर्नाटक राज्यातील बंगळुरू येथे वडिलांनी मुलाला जिवंत जाळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बंगळुरुतील चामराज पेट येथे एक वडिल आणि मुलामध्ये व्यवसायावरुन भांडण झाले. यानंतर पेशाने व्यावसायिक असलेल्या वडिलांनी मुलावर रंगकाम करताना वापरण्यात येणारे थिनर मुलावर शिंपडले. सुरेंद्र असे व्यावसायिक वडिलांचे नाव आहे. तर अर्पित हे मुलाचे नाव आहे. थिनर शिंपडल्यावर अर्पितला त्याचे वडील काय करतील याचा अंदाज नव्हता. त्यासाठी त्याने तिथून पळण्याचाही प्रयत्न केला नाही. मात्र, यावेळी वडील सुरेंद्र हे भयंकर रागात होते. त्यांनी आपल्या मुलावर माचिस ची काडीने जाळून त्याच्या अंगावर फेकली

0 Comments