-->

Ads

शिवाजीनगर पोलिस ठाण्यात छोट्या भावाने दिली मोठा भाऊ हरवल्याची माहिती

शिवाजीनगर पोलिस ठाण्यात छोट्या भावाने दिली मोठा भाऊ हरवल्याची माहिती


हरवलेल्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे नागरिकांना आवाहन


         उत्तरप्रदेशचा मूळ निवासी व सध्या अंधेरी येथे राहणाऱ्या वीरेंद्र यादव याने अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात माहिती दिली आहे की त्याचा मोठा भाऊ अशोक यादव हा दि. 18 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास अचानक बेपत्ता झाला आहे.

           अशोक यादव हा अंबरनाथमधील आनंदनगर एमआयडीसी परिसरातील एका फूड कंपनीत काम करतो व तेथेच राहत होता, 18 मार्च रोजी संध्याकाळी तो कोणाला काही न सांगता अचानक बेपत्ता झाला व आजपर्यंत घरी परतला नाही. त्याने अंगात पांढऱ्या रंगाची हाफ पॅन्ट व ब्राऊन रंगाचा टी शर्ट घातला आहे. तरी तो कोणाला आढळून आल्यास शिवाजीनगर पोलीस ठाण्याला सूचित करावे असे आवाहन शिवाजीनगर पोलीस ठाण्यातर्फे करण्यात आले आहे.


 

Post a Comment

0 Comments