-->

Ads

एक धडक अन् स्वप्नांचा झाला चक्काचूर; पुण्यात सायकलपटू युवतीचा हृदयद्रावक मृत्यू

 

पुणे (Pune) जिल्ह्यातील जुन्नरनजीक असणाऱ्या आगर खोरे याठिकाणी एका सायकलपटू तरुणीचा हृदयद्रावक शेवट (cyclist woman death) झाला आहे. संबंधित तरुणी भल्या सकाळी सायकलिंग करण्यासाठी गेली असता, काळानं तिच्यावर घाला घातला आहे. टेम्पोच्या धडकेत तिचा जागीच मृत्यू (Death in road accident) झाला आहे. या अपघातात तिच्यासह तिच्या स्वप्नांचा देखील चुराडा झाला आहे. या प्रकरणी टेम्पो मालकाविरोधात गुन्हा दाखल (Fir lodged) केला आहे. जुन्नर पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

गौरी विजय तांबे असं मृत पावलेल्या 19 वर्षीय तरुणीचं नाव आहे. ती कुरणच्या जयहिंद महाविद्यालयात अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षात संगणकशास्त्राचं शिक्षण घेत होती. तसेच ती सायकलपटू देखील होती. घटनेच्या दिवशी सकाळी गौरी सायकलिंग करण्यासाठी घराबाहेर पडली होती. दरम्यान घराजवळच तिला मृत्यूने गाठलं आहे. अपघाताची ही घटना घडताच, गंभीर जखमी झालेल्या गौरीला नातेवाईकांनी तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं.

पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं. या प्रकरणी जुन्नर पोलीस ठाण्यात टेम्पो मालक फारूक कुरेशी (खलिलपुरा, ता. जुन्नर) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. एका गुणवान सायकलपटू तरुणीचा अशाप्रकारे मृत्यू झाल्याने आगर खोरे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. गावातील नागरिकांनी टेम्पोचालविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

दुसऱ्या एका घटनेत, पुण्यातील बालेवाडी परिसरात राष्ट्रीय स्तरावरील हॉकीपटूंमध्ये खेळादरम्यान झालेल्या वादातून (dispute while playing hockey) दोन जणांवर प्राणघातक हल्ला (Attack on 2 national level hockey player) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका हॉकीपटूने आपल्या अन्य आठ मित्रांच्या मदतीने हा हल्ला केला आहे. यामध्ये एका हॉकीपटू तरुणाचे दोन दात तुटले असून दुसऱ्या तरुणावर चाकुने वार (Attack with knife) केल्याने तो गंभीर जखमी (Injured) झाला आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (FIR lodged) करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास केला जात आहे.

Post a Comment

0 Comments