-->

Ads

कुत्र्यासारखी वागते….महिला IPS संदर्भात भाजप आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य

म्हणून एन रविकुमार यांनी कथितरित्या त्यांची खिल्ली उडवली. ते म्हणालेले की, "शालिनी रजनीश दिवसा नेहमी मुख्यमंत्री सिद्धारमैया यांच्या कामामध्ये व्यस्त असतात आणि रात्री आपल्या सरकारी जबाबदाऱ्या पार पाडतात"


राजकीय नेते अनेकदा सार्वजनिक कार्यक्रमातून वादग्रस्त वक्तव्य करत असतात. महिलांचा सन्मान केला पाहिजे, स्त्रियांचा आदर केला पाहिजे, याचाही ते विचार करत नाहीत. अशाच एका कार्यक्रमात महिला पोलीस अधीक्षकाविषयी (SP) अपमानास्पद टिप्पणी करण्यात आली. भाजप आमदार बीपी हरीश त्यांच्या वक्तव्यामुळे सध्या चर्चेत आहेत. “महिला एसपी या दावणगेरे जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांच्या पाळीव कुत्र्यालप्रमाणे वागतात” असं वादग्रस्त वक्तव्य बीपी हरीश यांनी केलं. ते कर्नाटक विधानसभेचे आमदार आहेत.

भाजप आमदार बीपी हरीश बुधवारी दावणगेरे शहरात रिपोर्टर्स गिल्डद्वारे आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते. बीपी हरीश यांनी IPS अधिकारी उमा प्रशांत यांच्याबद्दल वक्तव्य केलं. “मी एक आमदार आहे. पण एसपी जेव्हा मला कुठल्या कार्यक्रमात पाहतात, तेव्हा त्या तोंड फिरवून घेतात. तसच त्या शमनूर कुटुंबांच्या सदस्यांची गेटवर उभ्या राहून वाट पाहतात. त्यांच्या घरातील पॉमेरियन कुत्र्याप्रमाणे वागतात” असं वक्तव्य बीपी हरीश यांनी केलं.

शमनूर कुटुंबाचा दावणगेरे क्षेत्रात चांगला राजकीय दबदबा आहे. वरिष्ठ काँग्रेस नेते शमनूर शिवशंकरप्पा आमदार आहेत. त्यांचा मुलगा एसएस मल्लिकार्जुन, सिद्धारमैया यांच्या सरकारमध्ये खाण, भूविज्ञान मंत्री आहे. त्यांची सून प्रभा मल्लिकार्जुन खासदार आहेत. भाजप आमदार बीपी हरीश यांनी महिला एसपीबद्दल अशी टिप्पणी केल्यानंतर त्यांच्या विरुद्ध FIR नोंदवण्यात आला आहे.

‘रात्री आपल्या सरकारी जबाबदाऱ्या पार पाडतात’

अलीकडच्या महिन्यात कर्नाटकात तिसऱ्यांदा असं घडलय, जेव्हा कुठल्या नेत्याने नोकरशहाचा अपमान केलाय. जुलै महिन्यात भाजपचे विधान परिषद सदस्य एन रविकुमार यांनी मुख्य सचिव शालिनी रजनीश यांच्याबद्दलअपमानजनक टिप्पणी केली होती. भाजप प्रतिनिधीमंडळ आलेलं, त्यावेळी शालिनी रजनीश उपस्थित नव्हत्या. म्हणून एन रविकुमार यांनी कथितरित्या त्यांची खिल्ली उडवली. ते म्हणालेले की, “शालिनी रजनीश दिवसा नेहमी मुख्यमंत्री सिद्धारमैया यांच्या कामामध्ये व्यस्त असतात आणि रात्री आपल्या सरकारी जबाबदाऱ्या पार पाडतात”

‘पाकिस्तानातून आल्या असतील’

या वक्तव्यानंतर एन रविकुमार त्यांच्याविरुद्ध FIR नोंदवण्यात आलेला. रविकुमार यांनी आपल्या वक्तव्याच समर्थन केलं होतं. स्पष्टीकरण देताना ते म्हणालेले की, शालिनी रजनीश यांच्याविरुद्ध कुठलीही अपमानास्पद टिप्पणी केलेली नाही. त्याआधी विधान परिषदेवर आमदार असणारे एन रविकुमार म्हणालेले की, “कुलबर्गीच्या उपायुक्त फौजिया तरन्नुम पाकिस्तानातून आल्या असतील” त्यावरुन वाद निर्माण झालेला.

Post a Comment

0 Comments