-->

Ads

नागपूर हादरलं, गतिमंद 8 वर्षीय मुलीवर 42 वर्षीय नराधमाकडून अत्याचार

  नागपूरमध्ये (nagpur) गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. रामबाग परिसरात 42 वर्षीय नराधमाने एका 8 वर्षीय बालिकेवर बलात्काराची (rape) केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणी नराधमाला अटक करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इमामवाडा पोलीस स्टेशन अंतर्गत रामबाग परिसरात ही घटना घडली.  या परिसरात राहणाऱ्या पीडित बालिकेवर तिच्याच घराच्या पाठीमागे राहणाऱ्या 42 वर्षीय आरोपीने आज दुपारी अत्याचार केले. सुरज लोखंडे असं या नराधमाचे नाव आहे. या पीडित बालिका गतिमंद असून ती घराबाहेर खेळत असताना आरोपीने तिला आपल्या घरात नेऊन तिच्यावर अत्याचार केले.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर पीडितेच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी पीडितेला नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले असून तिथे तिच्यावर उपचार सुरू आहे.

आरोपी सुरज लोखंडे सध्या एकटाच राहत असून त्याची पत्नी त्याला सोडून गेली आहे. तर त्याचा मुलगा इतर काही गुन्ह्यांमध्ये तुरुंगात आहे. दरम्यान, या घटनेमध्ये आरोपीला आणखी कोणी मदत केली का याची चौकशी पोलीस करत आहेत. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.दरम्यान, अल्पवयीन मुलीचा विनयभंगाचा गुन्हात अडकलेला राष्ट्रवादी नेता अखेर भंडारा जिल्ह्याच्या आंधळगाव पोलिसांना शरण आला. तब्बल 23 दिवसानंतर  आंधळगाव पोलिसांना आत्मसमर्पित केले आहे. सुमेध श्यामकुवर असे त्या आरोपीचे नाव असून शरणागती नंतर आंधळगाव पोलिसांनी त्याला अटक केली.

भंडारा वसतिगृहात राहणाऱ्या दहाव्या वर्गात शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर राष्ट्रावादी नेता व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुमेध श्यामकुवर याने हॉस्टेलमध्ये नेण्याच्या बहाण्यानेवरून आंधळगाव पोलीस स्टेशन हद्दीतील डोंगरगाव विहीरगाव रोडच्या शिवारात आपली चार चाकी गाडी थांबून त्यामध्ये पीडित अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना 25 फेब्रुवारीला सायंकाळी घडली होती. आरोपीची वैद्यकीय तपासणीनंतर त्याला सोमवारी कोर्टासमोर हजर केले जाणार आहे.

Post a Comment

0 Comments