-->

Ads

खासदार हेमंत पाटील यांच्या प्रयत्नाने उमरखेड महागाव तालुक्यातील १५५ पाणंद रस्त्यासाठी ४१ कोटी ७६ लक्ष रुपयाचा निधी मंजूर


उमरखेड /महागाव : मातोश्री ग्रामसमृद्धी शेत/ पाणंद रस्ते योजनेअंतर्गत हिंगोली लोकसभा मतदार संघातील उमरखेड आणि महागाव तालुक्यातील १५५ गावातील १७४ किमी लांबीच्या पाणंद रस्त्यासाठी ४१ कोटी ७६ लक्ष रुपयाचा निधी खासदार हेमंत पाटील यांच्या सात्यत्यपूर्ण पाठपुराव्याने  मंजूर करण्यात आला आहे. यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना आता  बारमाही रस्त्याची सुविधा उपलब्ध होणार आहे . 

             देशातील शेतीमध्ये यांत्रिकीकरणाचा उपयोग वाढल्यामुळे यंत्र सामुग्री शेतापर्यंत नेण्यासाठी आणि शेतमाल बाजारात  पोहचविण्याकरिता बारमाही शेतरस्त्याची आवश्यकता असते, असे रस्ते तयार करून शेतकऱ्यांना सुविधा देण्यासाठी राज्य शासनाने महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून मातोश्री ग्रामसमृद्धी शेत/ पाणंद रस्ते  योजना राबविण्याचा निर्णय घेतला आणि त्याची प्रभावी अमंलबजावणी करून राज्यभरातून यासाठी प्रस्ताव मागविण्यात आले होते .याच अनुषंगाने सदैव शेतकरी हिताच्या दृष्टीने कार्य करणारे हिंगोली लोकसभा मतदार संघाचे  खासदार हेमंत पाटील यांनी आपल्या मतदार संघातील शेतकऱ्यांना पाणंद रस्त्याचा लाभ व्हावा या उद्देशाने मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि राज्याचे  फलोत्पादन व रोजगार हमी मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून  हिंगोली लोकसभा मतदारसंघातील उमरखेड , महागाव  तालुक्यामध्ये पाणंद रस्त्यांना मंजुरी मिळवून आणली आहे . तालुक्यातील एकूण १५५ गावांमध्ये १७४ किलोमीटरचे रस्ते होणार असून याकरिता ४१ कोटी ७६ लक्ष रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला रोजगार हमीच्या माध्यमातून हि कामे केली जाणार असल्यामुळे गावातील मजुरांना यामुळे हक्काचा रोजगार मिळणार आहे . यामुळे राज्य शासनाची हि योजना खऱ्या अर्थाने सर्वांगीण विकास साध्य करणारी प्रभावी योजना आहे  असे म्हणावे लागेल . 

    प्रत्येक शेतकरी आणि गावकरी समृद्ध व्हावा उभा उद्देशाने राज्यात " गाव  समृद्ध तर माझा महाराष्ट्र हि संकल्पना " मग्रारोहयोतून राबविण्यात येत आहे गाव समृद्ध करण्यासाठी शेतरस्त्यांचे महत्व शहरांना जोडणाऱ्या महामार्गाच्या महत्वाएवढे आहे . पाणंद रस्त्यांच्या अभावामुळे शेतमालाच्या वाहतुकीला मर्यादा  येतात त्यामुळे शेतकरी फायद्याचे पीक घेत नाहीत त्यामुळे प्रमाणित दर्जाचे शेत /पाणंद रस्ते तयार करण्याकरिता मातोश्री ग्रामसमृद्धी शेत/ पाणंद रस्ते योजना राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे . रस्ते हे विकासाच्या वाटा असतात ग्रामीण भागात शेतरस्त्याची भूमिका गावाच्या विकासासाठी आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी महत्वाची आहे अश्या रस्त्यामुळे शेती विकासालाही चालना मिळू शकेल त्यामुळेच मातोश्री ग्रामसमृद्धी शेत/ पाणंद रस्ते योजना महत्वाची ठरणार आहे . असेही खासदार हेमंत पाटील म्हणाले .

Post a Comment

0 Comments