-->

Ads

पैसे देऊन विकत आणलेल्या बायकोनं दाखवला खरा रंग; पतीसह सासू-सासरे पोहोचले रुग्णालयात, थरारक घटना

 


 जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील पाचोरा याठिकाणी एक विचित्र घटना घडली आहे. एजंटमार्फत पैसे देऊन लग्न करणं (Did marriage by giving money) येथील एका कुटुंबाला चांगलंच महागात पडलं आहे. 1 लाख 70 हजार रुपये देऊन लग्न केल्यानंतर नवविवाहित अल्पवयीन तरुणीनं काही दिवसांतच आपला रंग दाखवला (Marriage fraud) आहे. संबंधित तरुणीनं आपल्या वडिलांच्या मदतीनं सासरच्यांना गुंगीचं औषध देऊन घरातून पळ काढण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचा हा प्रयत्न फसला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी नवविवाहित अल्पवयीन मुलीसह तिच्या वडिलांना अटक (Accused arrested) केली आहे. या घटनेचा पुढील तपास पाचोरा पोलीस करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परभणी जिल्ह्यातील पाथरी येथील रहिवासी असणाऱ्या राहुल अर्जुन पाटील नावाच्या तरुणाचा जालना जिल्ह्यातील अल्पवयीन मुलीसोबत विवाह झाला होता. 9 मार्च 2022 रोजी त्यांचा विवाह झाला होता. 25 मार्च रोजी नवविवाहितेला भेटण्यासाठी तिचे वडील पाचोरा याठिकाणी आले होते. याठिकाणी तीन दिवस राहिल्यानंतर लेकीला काही दिवस माहेरी घेऊन जातो, असं संशयित बापाने सासरच्या मंडळींना सांगितलं. पण त्यांनी मुलीला पाठवण्यास नकार दिला.

त्यामुळे त्याच दिवशी रात्री नवविवाहितेनं आपल्या बापाच्या मदतीने पळून जाण्याचा कट रचला. त्यानुसार आरोपींनी सासरच्या मंडळींना गुंगीचं औषध दिलं. सर्वजण झोपी गेल्यानंतर नवविवाहित आणि तिचे वडील रात्री दीडच्या सुमारास पळून जात असताना, अचानक सासरे अर्जुन उखा पाटील यांना जाग आली. सून आणि तिचे वडील बाहेर पडताना पाहून त्यांनी दोघांना हटकलं. यामुळे नवविवाहितेनं आणि तिच्या वडिलाने सासऱ्यासह पती आणि सासूला लोखंडी रॉडने मारहाण केली.

आरडाओरडा झाल्यानंतर आसपासच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत, नवविवाहितेसह तिच्या संशयित वडिलांना पकडून चोप दिला. यानंतर शेजाऱ्यांनी आरोपींना पाचोरा पोलिसांच्या ताब्यात दिलं. आरोपी नवविवाहिता अल्पवयीन असल्याने तिला जळगाव येथील बालसुधार गृहात पाठवण्यात आलं आहे. आरोपी वडिलांना न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपी वडिलाने गेल्या वर्षभरात आपल्या मुलीचा चार वेळा विवाह लावून दिल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे. परभणीतील एका महिला एजंटमार्फत हा विवाह पार पडला होता. याचा सविस्तर तपास पाचोरा पोलीस करत आहे.

Post a Comment

0 Comments