-->

Ads

20 वर्ष लहान तरुणीसोबत थाटला संसार; 5 महिन्यातच केली आत्महत्या, धक्कादायक कारण समोर

 

Suicide News: काही दिवसांपूर्वी एका 45 वर्षीय व्यक्तीने आपल्यापेक्षा 20 वर्षांनी लहान असणाऱ्या 25 वर्षीय तरुणीसोबत लग्न केलं होतं. संबंधित व्यक्तीने लग्नानंतर पाच महिन्यातच टोकाचं पाऊल उचललं आहे.



    नवी दिल्ली, 31 मार्च: काही दिवसांपूर्वी एका 45 वर्षीय व्यक्तीने आपल्यापेक्षा 20 वर्षांनी लहान असणाऱ्या 25 वर्षीय तरुणीसोबत (man married with 20 years younger woman) लग्न केलं होतं. दोघांच्या वयातील अंतरावरून संबंधित जोडप्याचे अनेक व्हिडीओज आणि फोटोज सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. लग्नानंतर पाच महिन्याच्या आतच संबंधित व्यक्तीनं टोकाचं पाऊल उचललं (suicide after 5 month of marriage) आहे. घरामागील बागेत मृतदेह आढळल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. त्यांच्या आत्महत्येमागचं धक्कादायक कारण समोर आलं आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

    शंकराप्पा असं आत्महत्या करणाऱ्या 45 वर्षीय व्यक्तीचं नाव आहे. ते कर्नाटकच्या (Karnataka) तुमकुर जिल्ह्यातील अक्कीमारी गावातील रहिवासी होते. 5 महिन्यांपूर्वी ऑक्टोबर 2021 मध्ये त्यांनी आपल्या वयापेक्षा 20 वर्षांनी लहान असणाऱ्या 25 वर्षीय मेघना सोबत लग्न केलं होतं. दोघांमधील वयाच्या अंतरामुळे हे जोडपं सोशल मीडियावर प्रचंड गाजलं होतं. दोघांनीही स्व:मर्जीने हा विवाह केला होता. लग्नानंतर काही दिवस सर्वकाही सुरळीत चाललं होतं.


    पण लग्नानंतर पाच महिन्यांत 45 वर्षीय शंकराप्पा यांच्या आत्महत्येची बातमी समोर आली आहे. घरामागील बागेत ते मृतावस्थेत आढळल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे. मृत शंकराप्पा यांनी नेमकी कशी आत्महत्या केली. याबाबत कोणतीही माहिती अद्याप समोर आली नाही.

    पण पत्नी आणि आईचा सतत वाद होत असल्याच्या कारणातून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं असल्याचं बोललं जात आहे. 45 वर्षीय शंकरप्पा यांनी अशाप्रकारे अचानक आयुष्याचा शेवट केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. 25 वर्षीय मेघना 4 महिन्यांची गरोदर असल्याची माहिती एका इंग्रजी वृत्तवाहिनीने दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास केला जात आहे.

    Post a Comment

    0 Comments