-->

Ads

दाजीच्या प्रेमात आकंठ बुडालेली महिला माणुसकीही विसरली; पतीसोबत केलं धक्कादाक कृत्य


  प्रेमात माणूस काहीही करू शकतो, असं तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. मात्र अनेकदा हेच प्रेम माणसाला गुन्हेगारीच्या मार्गावर आणून सोडतं. याचाच प्रत्यय देणारी एक घटना नुकतीच समोर आली आहे. यात आपल्याच बहिणीच्या नवऱ्यावर प्रेम जडल्याने महिलेनं अतिशय धक्कादायक कृत्य केलं (Extramarital Affair of Woman). तिने प्रियकर आणि इतर दोन लोकांसोबत मिळून पतीची निर्घृण हत्या केली (Husband Murder). काठीने मारून तिने पतीची हत्या केली.

हत्येच्या या घटनेनंतर पोलीस तपास करत होते, त्यावेळी हा खुलासा झाला. ही घटना बिराहच्या औरंगाबाद येथील नबीनगर येथील आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पत्नी संध्यादेवीने आपला पती धनंजय याची हत्या यासाठी केली कारण तिचं आपल्या दाजीवर प्रेम जडलं होतं आणि पती त्यांच्या नात्यात अडथळा ठरत होता.

या बहुचर्चित प्रकरणाचा खुलासा करताना, एसपी कांतेश कुमार मिश्रा म्हणाले की, 21 मार्च रोजी चंद्रगढचे रहिवासी गोपाल यादव यांनी नवीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. ज्यामध्ये त्यांनी आपला मुलगा धनंजय यादवच्या हत्येबद्दल सांगितलं होतं. गोपाल यादव यांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये अज्ञात गुन्हेगारांवर हत्येचा आरोप करण्यात आला होता. एफआयआर नोंदवल्यानंतर एसपींच्या सूचनेनुसार, प्रकरणाच्या चौकशीसाठी उपविभागीय पोलीस अधिकारी गौतम शरण ओमी यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष पथक तयार करण्यात आलं.

या प्रकरणाचा तपास पथकाने सुरू केल्यावर प्रकरणातील एकामागून एक गूढ समोर येऊ लागलं. या प्रकरणात मृत व्यक्तीच्या पत्नीचाच सहभाग असल्याचं निष्पन्न झालं. आपला दाजी लल्लू यादवसोबत असलेल्या प्रेमसंबंधांमुळे तिने हे पाऊल उचललं. मृताच्या पत्नीनेच प्रियकर आणि अन्य दोन गुन्हेगार सुदामा आणि कृष्ण कुमार यांच्यासोबत मिळून पतीची हत्या केली. खुनाच्या या घटनेत पुरावे समोर येताच पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून पोलिसांनी हॉकी स्टिक, हत्येत वापरलेली दुचाकी आणि चार मोबाईल जप्त केले आहेत.

Post a Comment

0 Comments