कुलेश्वरकुमार ध्यान गुप्ता (42, रा. रावल पाडा, दहिसर) आणि बबलू नावाच्या अन्य एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत अधिक माहिती देताना पोलिसांनी सांगितलं की, संबंधित आरोपी व्हॉट्सअॅपवरून ग्राहकांना तरुणींचे फोटो पाठवत (Sex racket through whatsapp) होते. त्यानुसार सौदा पक्का झाल्यानंतर त्यांना एका लॉजमध्ये वेश्याव्यवसायासाठी पाठवलं जात होतं. याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर, गुन्हे शाखा 1 चे पोलीस निरीक्षक रविराज कुराडे, सहाय्यक निरीक्षक पुष्पराज सुर्वे यांच्यासह पोलीस पथकाने सापळा रचून ही मोठी कारवाई केली आहे.
शुक्रवारी पोलिसांनी एका बनावट ग्राहकामार्फत व्हॉट्सअॅपद्वारे वेश्याव्यवसायासाठी तरुणी पुरवणाऱ्या व्यक्तीशी संपर्क साधला होता. समोरच्या व्यक्तीने आठ तरुणींचे फोटो पाठवले होते. त्यातील दोन तरुणींबाबत सौदा पक्का झाल्यानंतर आरोपीनं आगाऊ रक्कम ऑनलाईन पाठवण्यास सांगितलं. यानंतर व्हॉट्सअॅपवरील आरोपीनं काशिमीरा येथील सूर्यप्रकाश लॉजमध्ये तरुणींना पाठवत असल्याचं सांगितलं. लॉजमध्ये दोन खोल्या बुक केल्यानंतर एका रिक्षातून तीन तरुणींना लॉजजवळ आणण्यात आलं.
यावेळी रिक्षाचालक आणि एक तरुणी लॉजच्या बाहेरच रिक्षामध्ये थांबले. तर बबलू नावाचा आरोपी दोन तरुणींना घेऊन लॉजमध्ये शिरला. यावेळी आरोपी बबलूने बनावट ग्राहकाकडून पैसे स्वीकारताच त्याला रंगेहाथ अटक केली. तसेच लॉजच्या बाहेरून रिक्षाचालक कुलेश्वरकुमार यालाही ताब्यात घेतलं आहे. या छापेमारीत पोलिसांनी तीन तरुणींची सुटका केली असून तीन आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

0 Comments