पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलगी नागपूर एमआयडीसी परिसरातील रहिवासी आहे. काही वर्षांपूर्वीच तिच्या आईचं निधन झालं आहे. तर तिचे वडील हातमजूरी करतात. वडील कामावर गेल्यानंतर पीडित मुलगी एकटीच घरी राहायची. अशात शेजारी राहणाऱ्या एका 22 वर्षीय मुलासोबत तिची ओळख झाली. काही दिवसांतच त्यांच्या ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं. वडील कामावर गेल्यानंतर पीडित मुलगी एकटीच घरी राहत असल्याने हा मुलगाच तिला आधार वाटू लागला होता.
या प्रेमसंबंधातून त्यांनी लैंगिक संबंध ठेवले असता, 12 वर्षीय अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली. ही बाब दोघांच्या कुटुंबीयांना कळाल्यानंतर त्यांनी फेब्रुवारीमध्ये दोघांचा विवाह लावून दिला. दोघंही नागपूर एमआयडीसी परिसरात भाड्याच्या खोलीत राहू लागले. पण हा प्रकार आशा वर्कर्सच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी या घटनेची माहिती वरिष्ठांना दिली. वरिष्ठांनी याबाबत चौकशी केली असता, हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

0 Comments