-->

Ads

मुलगा होत नसल्यानं पत्नीला जिवंत जाळलं; चिमुकल्या लेकीनं आईला मिळवून दिला न्याय, कोर्टात सांगितला हत्येचा थरार


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अल्ताफ आणि मृत पत्नी शाहिस्ता यांचा काही वर्षांपूर्वी विवाह झाला होता. लग्नानंतर आरोपी अल्ताफ हा आपल्या पत्नीसह उचागाव येथील दबडे कॉलनी परिसरात राहत होता. या दाम्पत्याला तीन मुली झाल्या होत्या. शाहिस्ताला मुलगा होत नसल्याच्या कारणातून आरोपी अल्ताफ तिचा सतत छळ करत होता. दरम्यान 30 डिसेंबर 2013 रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास आरोपी सासू सासरे मुलगा अल्ताफकडे उचगावला आले होते. त्यांनी 'मुलगा होत नसल्याने पत्नीला मारून टाक', असं म्हणत अल्ताफला भडकावलं. मुलगा होत नसल्यानं पत्नीच्या अंगावर रॉकेल ओतून जिवंत जाळल्याप्रकरणी (Married woman set on fire alive) जिल्हा व सत्र न्यायालयानं पतीसह सासू आणि सासऱ्याला शिक्षा सुनावली आहे. तुला केवळ मुलीच होतात, मुलगा होत नाही म्हणून आईवर अत्याचार करणाऱ्या आरोपी वडिलांना आणि आजी आजोबांना तीन वर्षांच्या मुलीमुळे कठोर शिक्षा झाली आहे. संबंधित मुलीनं आईच्या हत्येचा थरार कोर्टात सांगितला आहे. मृत्यूपूर्वी महिलेनं दिलेला जबाब आणि तीन वर्षाच्या मुलीची साक्ष ग्राह्य धरून न्यायालयाने पतीसह सासूला जन्मठेपेची (life imprisonment) शिक्षा सुनावली आहे. तर सासऱ्यालाही तुरुंगवास झाला आहे.

अल्ताफ बुढेलाल ऊर्फ दादेसाब चमनशेख (पती), सरदारबी बुढेलाल ऊर्फ दादेसाब चमनशेख (सासू) आणि बुढेलाल ऊर्फ दादेसााब जिनासाब चमनशेख (सासरा) असं दोषी आढळलेल्या तिन्ही आरोपींची नावं आहेत. संबंधित सर्व आरोपी मूळचे बेळगाव जिल्ह्यातील कुडची येथील रहिवासी असून सध्या कोल्हापुरच्या उचगाव येथे वास्तव्याला होते. या प्रकरणी पत्नी शाहिस्ता चमनशेख यांनी मृत्यूपूर्वी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. साक्षी आणि पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने नऊ वर्षानंतर आरोपींना शिक्षा सुनावली आहे. हा महत्त्वपूर्ण निकाल न्यायाधीश एस आस पाटील यांनी दिला आहे.

त्यानुसार भडकलेल्या आरोपीनं आपल्या पत्नीच्या अंगावर रॉकेल ओतून तिला जिवंत जाळलं. त्यानंतर स्वत:च आरोपींनी पीडितेला सीपीआर रुग्णालयात दाखल केलं. हा सर्व प्रकार पीडित महिलेच्या तीन वर्षाच्या लेकीनं पाहिला होता. तसेच मृत शाहिस्ता यांनी मृत्यूपूर्वी पतीसह सासू सासऱ्याविरोधात तक्रार दाखल होती. तसेच स्थानिक तहसीलदाराने देखील पीडितेचा जबाब नोंदवून घेतला होता. तीन वर्षांची मुलगी आणि तहसीलदाराने कोर्टात दिलेल्या साक्षीच्या आधारे कोर्टाने पतीसह सासूला जन्मठेपेची तर सासऱ्याला तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.

Post a Comment

0 Comments