रंगाबाद, 19 मार्च : विषारी औषध घेऊन एका तरुणाने आपल्या आयुष्याचा शेवट केल्याची घटना समोर आली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात (Kannad Taluka Aurangabad) ही धक्कादायक घटना घडली आहे. आत्महत्या (Suicide) करताना या तरुणाने आपल्या मोबाइल फोनमध्ये विष प्राशन करतानाचा व्हिडीओ सुद्धा शूट केला होता. हा व्हिडीओ आता सोशल मीडियात व्हायरल होत आहे. (Youth suicide by shooting live video in mobile phone)
पल्यामुळे कोणालाही त्रास नको असं म्हणत त्याने विष प्राशन केले. माझ्यामुळे कुटुंबाला टेन्शन येत त्यामुळे मी माझे जीवन संपत असल्याचं तो तरुण म्हणत आहे. तसेच माझ्या या कृत्यासाठी मीच जबाबदार असल्याचंही तो म्हणत आहे. त्याने शूट केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
सुनील ढगे याने व्हिडीओ शूट करताच तो अनेक ग्रुपवर व्हायरल झाला. हा व्हिडीओ त्याच्या कुटुंबियांपर्यंत पोहोचला. त्यावेळी कुटुंबियांनी सुनीलचा शोध घेण्यास सुरुवात केली. सुनील हा बेशुद्धावस्थेत दिसून आला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.
डचिरोलीमध्ये काही दिवसांपूर्वी ही धक्कादायक घटना घडली आहे. पत्नीने आत्महत्या केल्याची बातमी समजताच एक सीआरपीएफ जवानाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धानोरा पोलीस ठाण्यात ही घटना घडली आहे. चंद्रभूषण जगत असं जवानाचं नाव आहे. या जवानाने स्वत: वर गोळी झाडून आत्महत्या केली आहे.
गडचिरोली जिल्ह्यात धानोरा पोलीस ठाण्यात केंद्रीय राखीव दलाच्या जवानांचा कॅम्प आहे. या कॅम्पमध्ये चंद्रभूषण जगत हे जवान कार्यरत आहेत या जवानांचे कुटुंबिय बाहेर गावी मुक्कामाने असते. आज सकाळी या जवानाला त्याच्या पत्नीने आत्महत्या केल्याची बातमी समजली. ही बातमी समजताच कर्तव्यावर असलेल्या चंद्रभूषण याने स्वतःकडे असलेल्या बंदुकीची गोळी झाडून आत्महत्या केली त्याला रुग्णालयात हलवण्यात आले होते. मात्र, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.
0 Comments