-->

Ads

मोबाईल चार्जिंगवरून वाद झाला अन् मित्रांनी केले मित्रावर चाकूने सपासप वार

 

क्षुल्लक कारणावरून तरुणामध्ये भांडण होऊन मग त्याचे रूपांतर हत्येमध्ये घडल्याचे प्रकार सध्या सर्राससमोर येत आहेत. असाच प्रकार ठाण्यातील (thane) वर्त्तकनगर परिसरात घडला आहे. मोबाईल चार्जिंगवरुन (mobile charging) झालेल्या भांडणात एका तरुणाची हत्या (murder) झाली असून यामध्ये तीन जणांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसाांनी दिलेल्या माहितीनुसाार, ठाण्यातील लोकमान्य नगर येथे मोबाईल चार्जिंगच्या कारणावरून साहिल आणि अभिषेक यांच्यात आपापसात  वाद झाला होता. हा वाद नेमका काय हे जाणून घ्यायला सुमित गेला होता. पण साहिल आणि अभिषेक यांना सुमित राऊतचा राग आला. याच रागातून त्यांनी अन्य मित्रांच्या सहाय्याने धारदार शास्त्राने अंगावर वार करत जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात सुमितचा जागीच मृत्यू झाला. वर्तक नगर पोलीस ठाण्यात अजून एका हत्येचा गुन्हा दाखल झाला असून ३ आरोपीना अटक करण्यात आली असून या प्रकरणी २ आरोपी  फरार आहेत. त्यांचा पोलीस शोध घेत आहेत.

५ आरोपीं पैकी १ आरोपी अल्पवयीन असल्याचं समोर आला आहे. सदर आरोपीची पार्शवभूमी पाहता ते अट्टल गुन्हेगार असल्याचं निदर्शनात  आलेय पुढील तपास  वर्तक नगर पोलीस स्टेशन मार्फत करण्यात येत आहे.

या सर्व प्रकरणामध्ये सुमित राऊत याचे नातेवाईक आक्रमक झाले असून आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी केली आहे. नाहीतर 'आरोपींना आमच्या ताब्यात द्या, आमच्या मुलाच्या खुनाचा बदला आम्ही घेऊ' अशी देखील आक्रमक प्रतिक्रिया सुमितच्या पालकांनी दिली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.

Post a Comment

0 Comments