-->

Ads

पुण्यात शेतकऱ्याची निर्घृण हत्या; नदीच्या काठावरून जाताना केला घात, धक्कादायक कारण उघड

 

Murder in Pune: पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यात माणुसकीला हादरवणारी घटना उघडकीस आली आहे. येथील एका शेतकऱ्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे.



वेल्हे, 15 मार्च: पुणे (Pune) जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यात माणुसकीला हादरवणारी घटना उघडकीस आली आहे. भावकीच्या वादातून येथील एका शेतकऱ्याची (Farmer) निर्घृण हत्या (Brural murder) करण्यात आली आहे. नदीच्या काठावरून जाताना मारेकऱ्यांनी अचानक त्यांच्यावर हल्ला करत त्यांचा जीव घेतला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल (FIR lodged) केला असून मुख्य संशयित आरोपीला अटक (Accused arrested) केली आहे. शेत जमिनीच्या वादातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. वेल्हे पोलीस आरोपीची कसून चौकशी करत आहेत.
किसन निवृती किन्हाळे असं हत्या झालेल्या 50 वर्षीय शेतकऱ्याचं नाव आहे. ते वेल्हे तालुक्यातील सोंडे माथना येथील रहिवासी होते. या प्रकरणी पोलिसांनी विनायक रामदास किन्हाळे (वय- 39) याला अटक केली आहे. मृत किसन निवृती किन्हाळे हे तंटामुक्त गाव समिती सोंडे माथनाचे अध्यक्ष होते. तसेच तोरणासागर विद्यालय निवीचे प्राचार्य मोहन किन्हाळे यांचे ते भाऊ होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून किन्हाळे यांचा आपल्या भावकीसोबत शेत जमिनीवरून वाद सुरू होता.

टनेच्या दिवशी मृत किसन किन्हाळे हे गुंजवणी नदीच्या काठावरून आपल्या घरी परत चालले होते. यावेळी दबा धरून बसलेल्या मुख्य संशयित आरोपी विनायक किन्हाळे यांनं त्यांच्यावर लाकडी दांड्यानं हल्ला केला. या हल्ल्यात किसन यांच्या डोक्याला व मानेला गंभीर दुखापत झाली. रक्ताच्या थारोळ्यात पडल्याने आसपासच्या नागरिकांनी त्यांना तातडीने भोर तालुक्यातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्राथमिक तपासणी करत उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित केलं.

या घटनेची माहिती मिळताच वेल्हे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करत मुख्य संशयित आरोपी विनायक किन्हाळे याला अटक केली आहे. किसन किन्हाळे यांच्या हत्येमुळे गावात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे वेल्हे पोलिसांनी गावात पोलीस बंदोबस्त वाढवला आहे. या घटनेचा पुढील तपास वेल्हे पोलीस करत आहेत.

Post a Comment

0 Comments