-->

Ads

प्रेमात वेड्या झालेल्या नराधमाने अडीच वर्षांच्या मुलाचं डोकं कापलं; न्यायाधीशांनीही सुनावली भयंकर शिक्षा

  

हरयाणातील (Haryana News) हिसार कोर्टाने आज एका नराधमासाठी मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली. आरोपीने चार वर्षांपूर्वी एका अडीच वर्षांच्या मुलाचं डोकं कापून हत्या केली होती. तो मुलाच्या बाळाच्या आईच्या प्रेमात इतका वेडा झाला होता की, त्याने मुलालाच मारून टाकलं. एक आठवड्यापूर्वी अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश गुरविंदर सिंग वधना यांनी आरोपीला दोषी करार दिला होता. आता त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

कोर्टाने ज्या आरोपीला मृत्यूची शिक्षा घोषित केली. त्याचं नाव हेमराज आहे. आणि तो हिसार येथील गैबीपूर गावातील राहणारा आहे. 16 जून 2018 रोजी हेमराजने शेतात एका अडीच वर्षांच्या बाळाचा मृतदेह सापडला होता. त्याचं डोकंही धडाहून वेगळं केलं होतं. जेव्हा गावाचे सरपंच अर्जुन मेहताने याबाबत पोलिसांनी सूचना देऊन घटनास्थळी बोलावलं आणि मृतदेह बाहेर काढला. यानंतर प्रकरणाचा तपास केला तर समोर आलं की, हेमराजनेच मुलाची हत्या करून शेतात पुरलं होतं. हेमराजला अटक करून तुरुंगात पाठविण्यात आलं होतं.

पोलिसांनी जेव्हा प्रकरणाता तपास केला तर मुलाचं नाव शिवा असल्याचं समोर आलं आहे. ही हत्या आरोपीने प्रेम प्रकरणातून केली. हेमराजचं शिवाची आई सुमनसोबत प्रेम प्रकरण होतं. यासाठी तो तरुणीला लग्नाचं आमिष दाखवून तिच्या मुलाला 14 एप्रिल 2018 रोजी आपल्यासोबत घेऊन गेला होता. मात्र त्याला तिचं मूल फार आवडत नव्हतं. यासाठी एके रात्री तो मुलाला आपल्यासोबत घेऊन गेला. 16 जूनच्या रात्री शिवाची हत्या करण्यात आली. इतकच नाही तर धारदार हत्याराने पहिल्यांदा तिचं डोकं कापलं. आणि दोघांना विविध ठिकाणी पुरलं.

Post a Comment

0 Comments