-->

Ads

चिमणी संवर्धन काळाची गरज ,मुख्याध्यापिका भोयर मॅडम


महागाव प्रतिनिधी :-संजय जाधव

महागाव तालुक्यातील समाज कल्याण महाविद्यालय महागाव वतीने  चिमणी दिवसाचे औचित्य साधून पक्ष्यांसाठी पाणपोई ची निर्मिती निसर्गाची अमुल्य अशी जैवविविधता टिकून ठेवण्याची जबाबदारी आपल्या प्रत्येकावर आहे. निसर्ग नसेल तर माणूस टिकणार नाही. यासाठी निसर्गाचा अविभाज्य घटक असलेल्या चिमण्यांचे संवर्धन करणे काळाची गरज असल्याचे मत अनु जाती निवासी शाळा महागाव येथील मुख्याध्यापिका भोयर  मॅडम यांनी मत व्यक्त केले. काळाच्या ओघात चिमणी दिसेनाशी झाली. आत्ताच्या पिढीला चिमण्यांचा चिवचिवाट कानी पडणे दुर्मिळ झाले आहे. कविता, बडबड गीते याचपुरती चिमणी शिल्लक राहते की काय अशी भीती निर्माण झाली आहे. शहरीकरणामुळे आता सिमेंट काँक्रीटची घरे उभी राहिली आणि चिमण्यांचे कौलारू घरांचे छञ हरवले. मोबाईल टॉवरमधून ● उत्सर्जित होणारी किरणे, कीटकनाशकांचा अतिरेकी वापर, बेसुमार वृक्षतोड, जागतिक तापमान वाढ यामुळे असंतुलित होत आहे आपले काही देणे लागते म्हणून समाज कल्याण महाविद्यालय महागाव च्या मुख्याध्यापिका भोयर मॅडम व समाज कल्याण निवासी शाळा महागाव विभागाच्या वतीने जागतिक चिमणी दिवसाचे औचित्य साधून चिमण्यांना पाणी व अन्न ठेवण्यासाठी महाविद्यालय परिसरात पक्ष्यांसाठी पाणपोई सुरू करण्यात आली. कार्यक्रमाला अनु जाती मुलांची शासकीय निवासी शाळा महागाव महाविद्यालयाचे मुख्याध्यापिका भोयर मॅडम वार्डन किनगावकर मॅडम ,चौधरी मॅडम, साबळे सर, राऊत सर, धारे सर ,गणेश बुरकुले सर, नपते सर, भगत मॅडम ,गायकवाड मॅडम, रमेश पडघणे, माधव कोल्हे सुरक्षारक्षक  विद्यार्थिनी, मोठ्या संख्येने उपस्थित होते

Post a Comment

0 Comments