नवी मुंबई : #आंबा प्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. फळांचा राजा आंब्याची चव यंदा खवय्यांना लवकर चाखायला मिळणार आहे. यावर्षी चा कोकणच्या हापूस आंब्याची पहिली पेटी #नवीमुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दाखल झाली असून कोकणातील देवगड तालुक्यातील कुणकेश्वर गावातील वाळकेवाडी येथील शेतकरी अरविद वाळके यांनी हा आंबा आणलाय. या हंगामातील पाहिले 25 डझन आंबे आज बाजार समितीमध्ये दाखल झाले असून या आंब्याची व्यापाऱ्यांकडून पूजा करत विक्रीसाठी ठेवण्यात आले. या आंब्याच्या एक डझनला चार ते पाच हजार रुपयांचा भाव मिळालाय. या महिन्यात त्याच्या शेतातून 50 पेट्या आंबा मार्केट मद्ये येणार आहे.
0 Comments