अंबरनाथ : #शिवसेनेचे #अंबरनाथ शहरप्रमुख #अरविंद #वाळेकर व माजी #नगराध्यक्षा #मनिषा अरविंद वाळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नवरेनगर विभागप्रमुख मिलिंद गान, महिला उपशहर संघटक चंदा गान व झेनो हेल्थ यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन अंबरनाथ पूर्वेकडील गौरी शॉपिंग कॉम्प्लेक्स येथे आयोजित करण्यात आले होते. या तपासणी शिबिरात तापमान, ऑक्सिजन पातळी, मधुमेह, रक्तदाब तपासणी व बीएमआय आदि तपासण्या मोफत करण्यात आल्या असून या शिबिराचा नवरेनगर परिसरातील नागरिकांसह आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी ही लाभ घेतल्याची माहिती आयोजकांनी दिली.
याप्रसंगी राजकुमार सिंग, संदीप मोरे, राकेश पांडे, प्रमोद जयस्वाल, मंगेश वाघमारे, राहुल सोनवणे, संकेत पवार, अतुल देशमुख, शरद मोडक, अमोल धांडे, विनोद धेडे, उमेश नाईक, मनिषा पवार, भाग्यश्री देशमुख, राजेश्री खांडेकर, वैशाली मुळे, चंदा जाधव यांच्यासह अनेक मान्यवर, पदाधिकारी व परिसरातील नागरिक उपस्थित होते.
उस्मान शाह, अंबरनाथ
0 Comments