औरंगाबाद शहरातील विभागीय कार्यालय येथील बस डेपो परिसरात एसटी कर्मचारी च्या विविध संघटनेने आज एकत्रितपणे संप पुकारला असून, विविध मागण्या मान्य झाल्याशिवाय संप मागे न घेण्याचा निर्णय आज एसटी कर्मचारी संघटनेच्या वतीने घेण्यात आला आहे, सदरील संपामध्ये आज एसटी महामंडळातील विविध विभागातील सर्वांनी एकत्रितपणे संप पुकारल्याने याचा फटका सामान्य माणसाला बसणार आहे, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील एसटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी गेल्या काही दिवसांपासून संप पुकारला होता यात काही संघटनेने सहभाग घेतला होता तर काही संघटने ने जबाबदारी सांभाळून काम सुरु केले होते मात्र आज एसटी कर्मचारी विविध संघटनेची बैठक होऊन एकत्रितपणे सहभाग करण्याचे आव्हान करण्यात आले होते यात शहरातील सर्व विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सदरील संपामध्ये सहभाग नोंदविला आहे,
सदरील एसटी कर्मचारी आक्रमक झाल्याचे दिसून आले असून जो पर्यंत मागण्या मान्य होणार नाही तेव्हापर्यंत काम बंद आंदोलनाचा इशारा एसटी कर्मचारी संघटनेच्या वतीने आज रोजी देण्यात आला आहे,सदरील आंदोलनकर्त्यांची एसटी कर्मचारी संघटनेची एसटी महामंडळाच्या उच्च अधिकाऱ्यांशी चर्चा केली मात्र या वरती कोणत्याच प्रकारचा तोडगा निघाला नाही,महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाला राज्य शासनात विलीन करण्याची मागणी जोर धरीत असून जो पर्यंत मागणी मान्य होणार नाही तेव्हापर्यंत संप मागे घेणार नाही अशी भूमिकाम आज एसटी कर्मचारी संघटनेने घेतली आहे.
0 Comments