उरण : विध्यार्थ्यांच्या आकलनशक्तीत जास्तीत जास्त प्रगल्भ करण्याच्या हेतूने आपली शिक्षण व्यवस्था प्रयत्नशील असते त्या साठी वेगवेगळे वेळोवेळी शाळांमध्ये उपक्रम हि राबवले जातात सध्या सर्व शाळांमध्ये अनुभवातून शोधूया विज्ञानाचे झरे उपक्रम सुरु आहेत.
रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात असणारी रायगड जिल्हा परिषदेची चिरनेर येथील शाळेने विध्यार्थ्यांना विज्ञान विषया बद्दल आवड नोइर्मां व्हावी आणि त्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोन जागा होऊन त्यांच्या आकलनशक्तीत भर पदवी या हेतूने अनुभवातून शोधूया विज्ञानाचे झरे या नावाचे उपक्रम शाळेत राबविण्यात आले या उपक्रमात विध्यार्थ्यांना सुयोग्य आहाराबद्दल प्रत्यक्ष आहार उपलब्ध करून त्या आहारातून मिळणारे पोषक तत्त्वे जीवनसत्व प्रथिने कर्बोदके स्निग्ध पदार्थ क्षार इत्यादी माहिती शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना देण्यात आली.
हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक प्रवीण म्हात्रे शिक्षक विशवनाथ गावंड शिक्षिका रंजना कोळी संगीत गावंड यांनी मेहनत घेतली तसेच उपशिक्षक सुरेश पाटील यांनी विध्यार्थ्यांना चौकस आहाराबद्दल सखोल माहिती दिली शाळा व्यवस्थापन समिती सदस्य अंगणवाडी सेविका विद्यार्थी आणि पालक यांच्या उपस्थिती बद्दल आणि सहकार्य बद्दल मुख्याधापक प्रवीण म्हात्रे यांनी आभार व्यक्त केले.
रायगड-उरण प्रतिनिधी कुलदीप कोळी



0 Comments