अंबरनाथ : श्रावण महिना म्हणजे हिंदू धर्मातील सणांची आणि उत्साहाची उधळण, याच महिन्यात खास स्त्रियांचा पारंपरिक मंगळागौर सण साजरा केला जातो, त्याच अनुषंगाने अंबरनाथच्या माजी नगराध्यक्षा मनीषा वाळेकर यांनी खुंटवली परिसरातील शिवम मंगल कार्यालयात शहरातील स्त्रियांसाठी मंगळागौर कार्यक्रमाचे आयोजन केले होते, कोरोना परिस्थिती लक्षात घेता फक्त शंभर स्त्रियांनाच या कार्यक्रमात प्रवेश देण्यात आला होता.
सदर कार्यक्रमात शहरातील जागर मंच महिला मंडळाच्या महिलांनी विविध पारंपरिक गाण्यांवर नृत्य व खेळ सादर करून उपस्थितांची मणे जिंकली. शिवसेनेचे शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांच्यासह अनेक माजी नगरसेविका व महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रमात उपस्थिती लावली होती.
0 Comments