-->

Ads

शिवसेनेचे अंबरनाथ शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांची अनोखी संकल्पना

                     नागरिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आयुष  काढा वाटप


 देशभरात धुमाकूळ घातलेल्या कोरोना वायरसला आळा घालण्यासाठी शासनाने लॉकडाऊनचा मार्ग अवलंबला आणि तो सार्थक ही ठरत आहे, परंतु आता चार महिन्याच्या कालावधीनंतर लॉकडाऊन मध्ये काही प्रमाणात शिथिलता आणली जात आहे, तरी कोरोना बधितांची संख्या वाढतच आहे, म्हणून या व्हायरस सोबत लढण्यासाठी आणि नागरिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी स्वखर्चाने विविध औषोधोपयोगी वस्तूंपासून आयुष्य काढा बनवून तो शहरातील विविध परिसरातील नागरिकांना मोफत वाटण्याची संकल्पना शिवसेनेचे शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांना सुचली व माजी नगराध्यक्षा मनीषा वाळेकर यांनी त्याला पूर्णरुप दिले.
        अंबरनाथ पूर्वेकडील शिवमंदिर परिसरात राहणारे विनायक खराटे हे विविध आयुर्वेदिक काढा बनवून ते विकण्याचा व्यवसाय करतात, त्यांच्या मदतीने मनीषा वाळेकर यांनी आपल्या राहत्या घरी लवंग, वेलची, दालचिनी, तुळस, गूढ, अद्रक आदी वस्तूंपासून आयुष काढा तयार केला आणि शिवसैनिक प्रकाश डावरे, संजय गावडे आदींच्या माध्यमातून तो काढा मंगळवारी संध्याकाळी खुंटवली येथील भवानी चौकातील नागरिकांना वाटप करून या संकल्पनेची सुरुवात करण्यात आली, पुढे दररोज असा काढा बनवून तो शहराच्या विविध परिसरातील नागरिकांना वाटणार असल्याचे माजी नगराध्यक्षा मनीषा वाळेकर यांनी सांगितले.

कॅमेरामन गणेश म्हेत्रे सह उस्मान शाह, अंबरनाथ

                                                                            

Post a Comment

0 Comments