शिवसेनेचे शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांचा विद्युत विभागाला इशारा
कोरोना महामारीच्या काळातील वाढीव युनिटचा वीज आकार व अचानक केलेली दरवाढ वाढवून महावितरण यांनी नागरिकांना वेठीस धरले आहे. त्या संदर्भात शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांनी आपल्या पत्रा द्वारे महावितरणाला जाहीर निवेदन दिले.
उस्मान शाह, अंबरनाथ
अंबरनाथ मधील नागरीक गेली चार-पाच महिन्यापासून कोरोना विषाणू मुळे सर्व उद्योग धंदे ,व्यवसाय,बंद आहेत. लोकानंवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यातच महावितरण यांनी
नागरिकांना भरमसाट विज बिल पाठवले. शिवसेना नेहमीच जनतेच्या पाठी मागे खंबीरपणे उभी राहते. म्हणून शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांनी महावितरणाला आपल्या पत्रा द्वारे इशारा दिला आहे. लॉकडाऊन काळात ग्राहकांचा वीज खंडित करू नये व अचानक केलेली दरवाढ त्वरित रद्द करावी.
वीजवापर युनिट दराप्रमाणे वीज बिल आकारण्यात यावे. अन्यथा शिवसेनेच्या माध्यमातून हे प्रकरण हाताळावे लागले असा इशारा दिला. हे निवेदन उपशहरप्रमुख संभाजी कळमकर, विभाग प्रमुख पद्माकर दिघे, प्रकाश डावरे, देवा राठोड यांनी दिले.

0 Comments