आत्महत्येची एक भयानक घटना महाराष्ट्रातून समोर आली आहे
धुळे, 23 जुलै : राज्यात कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू असलं तरी हत्या आणि आत्महत्येच्या अनेक धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. आत्महत्येची अशीच एक घटना धुळ्यातून समोर आली आहे. आई आणि दोन चिमुकल्या मुलींना गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना साक्री गावात घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आईने आधी मुलींना गळफास देत नंतर स्वतः आत्महत्या केली. यामध्ये तिघींचाही जागीच मृत्यू झाला. साक्री शहरातील आदर्श नगर मधील ही घटना आहे. अनिता शिंदे(आई), रिया शिंदे (5) आणि भाग्यश्री शिंदे (3) या अशी तिघींची नावं आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.

0 Comments