-->

Ads

14 वर्ष केला देहाच्या व्यापार, आता हाती लागले हक्काचे काम; 'चिची हाऊस'ची कहाणी

भिवंडी शहरातील हनुमान टेकडी येथील 500 हुन अधिक देहव्यापार करणाऱ्या महिलांमुळे बदनाम झालेली वस्ती


भिवंडी, 25 जुलै : देहव्यापार करणाऱ्या महिलांचे जीवन म्हणजे अंधकारमय, यातनादायी जीवन या नरकात कोणीही स्वखुशीने येत नसून त्या लोटल्या जात असताना त्यांना स्वलांबनाची शिकवण दिल्यावर त्यांच्या सुद्धा जीवनात आशेचा किरण चमकू लागला.  त्यांनी या नरकयातना भोगण्याचे सोडून सर्वसामान्य जीवन जगण्याचा संकल्प केला असता त्यांना नुकताच एका संस्थेच्या माध्यमातून स्वतः च्या घरात सर्वसामान्य जीवन जगण्याची उमेद दिली.
भिवंडी शहरातील हनुमान टेकडी येथील 500 हुन अधिक देहव्यापार करणाऱ्या महिलांमुळे बदनाम झालेली वस्ती. परंतु, या ठिकाणी श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून श्री साई सेवा संस्थेच्या स्वाती [सिंग] खान यांनी चार वर्षांपूर्वी सामाजिक आरोग्य विषयक कार्यास सुरुवात केली. या महिलांशी या काळात स्वाती खान यांचे स्नेहाचे संबंध निर्माण झाले.
मार्च महिन्यात देशभरात कोरोना विषाणूने थैमान घालण्यास सुरुवात केल्यानंतर देशभरात लॉकडाऊन लागू झाला. या काळात असंख्य उद्योग व्यवसाय रोजगार बंद असतानाच स्वाती खान यांच्या नेतृत्वाखाली येथील महिलांनी कोरोनाचा संसर्ग टाळावा यासाठी आपले रोजगार असलेला देहव्यापार बंद करण्याचा धाडसी निर्णय घेतला

Post a Comment

0 Comments