-->

Ads

अंधश्रद्धेतून मायलेकाचा बळी, कल्याणमधील धक्कादायक प्रकाराने सर्वत्र खळबळ

अंगात भूत असल्याच्या संशयावरून लाकडी दांडक्यानं बेदम मारहाण करून मायलेकाला जीवे ठार मारल्याची घटना कल्याण शहरातील खडकपाडा परिसरात घडली आहे




कल्याण, 26 जुलै: अंगात भूत असल्याच्या संशयावरून लाकडी दांडक्यानं बेदम मारहाण करून मायलेकाला जीवे ठार मारल्याची घटना कल्याण शहरातील खडकपाडा परिसरात घडली आहे. अटाळी येथे अंधश्रद्धेतून मायलेकाचा बळी दिल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकारामुळे शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी खडकपाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी अघोरी बाबासह चार आरोपींना ताब्यात घेतलं आहे. आरोपींमध्ये एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे.
पंढरीनाथ शिवराम तरे (50) आणि चंदूबाई शिवराम तरे (76) अशी मृतांची नावं आहेत. मायलेकाच्या अंगात भूत येत असल्याच्या संशयावरून दोघांना नातेवाईकांनी अटाळी येथील अघोरी बाबाकडे नेलं होतं. अघोरी बाबाच्या सांगण्यावरून नातेवाईकांनीच मायलेकांना भूत उतरवण्याच्या नावाखाली लाकडी दांडक्यानं बेदम मारहाण केली. त्यात दोघांचा मृत्यू झाला. खडकपाडा पोलीस ठाणे हद्दीत शनिवारी रात्री ही धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे



मायलेकाच्या अंगात भूत आहे, असा दावा अघोरी बाबा सुरेश पाटील याने केला होता. अंगातील भूत काढण्यासाठी दोन्ही मायलेकांची पूजा करावी लागेल असंही त्यानं सांगितलं होतं. शनिवारी सायंकाळी साडेचार वाजता अघोरी बाबाच्या सांगण्यावरून नातेवाईकांनीच मायलेकाला बेदम मारहाण केली. त्यात दोघांचा जागेवरच मृत्यू झाला.

Post a Comment

0 Comments