-->

Ads

किर्ती आज मी या जगाचा निरोप घेतोय, आता तरी तू…मृत्यूपूर्वी शेवटचा व्हिडिओ, नवरा अनंतवर अशी वेळ का आली?

"सूनेचा फोन आला. तिने सांगितलं की, तुमच्या मुलाने विष प्राशन केलय. याला इथून घेऊन जा. आम्ही लगेच तिथे गेलो. मुलाला स्थानिक रुग्णालयात घेऊन गेलो. तिथे त्याची तब्येत बिघडत होती. म्हणून डॉक्टरांनी त्याला जवाहरलाल नेहरू रुग्णालयात घेऊन जायला सांगितलं. पण रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला"

एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. एक होमगार्ड जवानाचा मुलगा अनंत कुमार ऊर्फ छोटू याचा विषामुळे मृत्यू झाला आहे. अनंत कुमारने लव्ह मॅरेज केलं होतं. पत्नीवरच विष देऊन मारल्याचा आरोप आहे. महत्वाच म्हणजे अनंत कुमारने त्याच्या मृत्यूच्या आधी व्हिडिओ बनवून हा आरोप केला. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. अनंत कुमारच्या आई-वडिलांनी सूनेच्या कुटुंबियांवर आरोप केला आहे. सूनेच्या कुटुंबियांनी विष देऊन आपल्या मुलाला मारलं, असा त्यांचा आरोप आहे. अनंतने पत्नीच्या कुटुंबियांना 6 लाख रुपये दिले होते. आता त्याला पैशांची गरज होती. म्हणून सासरच्यांकडे पैसे परत मागत होता. अनंतच एक व्हिडिओ सुद्धा समोर आलाय.


24 वर्षाच्या अनंतचा एक व्हिडिओ समोर आलाय. त्यात त्याने म्हटलय की, “मला पत्नीने विष दिलं. माझ्या मृत्यूसाठी माझी पत्नी कीर्ति मिश्रा, माझी सासू, तिचे आजी-आजोबा आणि मामा-मामी जबाबदार असतील” “कुटुंबाशिवाय त्याने विकास कुमार झा च सुद्धा नाव घेतलं आहे. तो मुलीला आणि तिच्या कुटुंबाला मदत करत होता, असा अनंतचा दावा आहे. त्यांना जेलमध्ये पाठवलं पाहिजे” असं अनंत त्या व्हिडिओत म्हटलं आहे.

“या लोकांनी माझ्याकडून पैसे घेतले, पण ते परत केलेले नाहीत. उलट माझ्यावर खोटी केस दाखल केली. एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये कीर्तीला दाखवत अनंत म्हणाला की, किर्ती आज मी या जगातून जात आहे, आता तू खुश आहेस ना? आता एक काम कर, पाच वर्षांपूर्वी मी तुझ्यावर 6 लाख रुपये खर्च केलेले, तर मला परत करं” असं अनंत या व्हिडिओमध्ये बोलला.

प्रेमाच्या जाळ्यात फसवून मंदिरात लग्न

नवगछिया टाउन पोलीस ठाणे क्षेत्रातील हे प्रकरण आहे. अनंतचे वडिल विवेकानंद चौधरी म्हणाले की, “माझी सून, तिची आई आणि तिच्या कुटुंबातील अन्य सदस्यांनी विष देऊन माझ्या मुलाची हत्या केली. मी भवानीपूर पोलीस ठाण्यात ड्युटीवर होतो. मला पत्नीने घटनेची माहिती दिली” “तीन ते चार महिन्यापूर्वी सुद्धा सूनेने पोलीस ठाण्यात जाऊन मोठा वाद घातला होता. खोट्या प्रकरणात तुम्हाला अडकवून तुरुंगात पाठवीन. माझ्या मुलाकडून आधी पैसे घेतले. मग, पैसे द्यावे लागू नयेत, म्हणून त्याला प्रेमाच्या जाळ्यात फसवून मंदिरात लग्न केलं” असा आरोप विवेकानंद चौधरी यांनी केला. वडिलांनी सांगितलं की, “माझा मुलगा सतत सून किर्तीच्या घरी दिलेले पैसे परत घेण्यासाठी जात होता. सोमवारी सुद्धा तो त्यांच्या घरी गेलेला”


Post a Comment

0 Comments