-->

Ads

Mumbai Rains: विकास झाला भकास! दोन महिन्यापूर्वी केलेला मुंबईतील रस्ता पावसाने गेला वाहून...

 

Mumbai Rains: विकास झाला भकास! दोन महिन्यापूर्वी केलेला मुंबईतील रस्ता पावसाने गेला वाहून...


Mumbai Rains Update: हा रस्ता दोन महिन्यांपूर्वी महापालिकेच्या माध्यमातून बनवण्यात आला होता. नागरिकांनी या रस्त्याच्या कामासंदर्भात आवाजही उठवला होता.


मुंबईत आज पहाटेपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. या पावसामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचल्याचे पाहायला मिळत आहे. अंधेरी पूर्वेकडील अंधेरी सभेला जोडणारा जो मुख्य रस्ता आहे, तो रस्ताच मुसळधार पावसात वाहून गेला आहे.

हा रस्ता दोन महिन्यांपूर्वी महापालिकेच्या माध्यमातून बनवण्यात आला होता. नागरिकांनी या रस्त्याच्या कामासंदर्भात आवाजही उठवला होता. आज हा रस्ता पूर्णपणे पाण्याखाली वाहून गेल्याने रस्त्याच्या कामावर नागरिकांनी पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण केला आहे.

मुंबईत पहाटेपासूनच मुसळधार पाऊस कोसळत आहे. परिणामी मुंबईतील अनेक सखल भाग हे जलमय झाले आहेत. अंधेरी पूर्व-पश्चिमेला जोडणारा अंधेरी सबवे देखील पाण्याखाली गेला आहे आणि सध्या अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. सबवे मध्ये पाच फुटापर्यंत पाणी साचल्याचे पाहायला मिळत आहे. याच परिसरातून आमचे प्रतिनिधी संजय गडदे यांनी घेतलेला हा आढावा आहे.

मुंबईतील मुसळधार पावसाचा आमदारांना फटका, अधिवेशनासाठी निघताना अडकले

मुसळधार पावसामुळे अनेक आमदार अधिवेशनासाठी निघताना अडकले आहेत. विदर्भ आणि अमरावती एक्सप्रेस कुर्ला, घाटकोपरदरम्यान अडकल्या आहेत. यात १० ते १२ आमदार अडकले आहेत. आमदार अमोल मिटकरी आणि मंत्री अनिल पाटील हे ट्रँकनं चालत बाहेर निघाले आहेत.


Post a Comment

0 Comments