-->

Ads

Sharad Pawar: अजितदादांच्या आमदारांना दिली डेडलाईन, मंत्र्यांच्या मतदारसंघात उमेदवार फायनल

 Sharad Pawar: लोकसभेचे निकाल लागले तेव्हा अजित पवार गटाचे ५ ते ६ आमदार संपर्कात असल्याची शरद पवार गोटातून चर्चा होती. दरम्यान अजित पवार गटाचे १८ ते १९ आमदार आमच्या संपर्कात आहेत. या आमदारांना १५ दिवसात निर्णय घ्यावा लागणार, असे रोहित पवार म्हणाले.





लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर अजित पवार गटाचे टेन्शन वाढले आहे. अजित पवार गटाला लोकसभा निवडणुकीत फक्त एक जागा मिळाली. ही निवडणूक अजित पवार गट आणि शरद पवार यांच्यासाठी अस्तित्वाची लढाई होती. मात्र ही लढाई शरद पवार यांनी जिंकल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

अजित पवार गटाचे काही आमदार शरद पवार गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चा देखील सुरु आहेत. लोकसभेत यश न आल्यामुळे विधानसभेची चिंता अजित पवार गटातील आमदांराना लागली आहे. या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी केलेल्या विधानामुळे महाराष्ट्रात पुन्हा भूकंप होणार का?, अशी चर्चा देखील रंगली आहे.



लोकसभेचे निकाल लागले तेव्हा अजित पवार गटाचे ५ ते ६ आमदार संपर्कात असल्याची शरद पवार गोटातून चर्चा होती. दरम्यान अजित पवार गटाचे १८ ते १९ आमदार आमच्या संपर्कात आहेत. या आमदारांना १५ दिवसात निर्णय घ्यावा लागणार, असे रोहित पवार म्हणाले.

अजितदादा गटातील मंत्र्यांच्या मतदारसंघातील उमेदवार ठरले -

शरद पवार यांनी अजित पवार गटातील मंत्र्यांच्या मतदारसंघातील उमेदवार ठरवले आहेत. आज फक्त चर्चा आहे. पुढच्या १५ दिवसात काय होतं ते बघा. दादा आणि पक्षाचे नेते पुढे बसलेले असताना आमदार काय बोलणार त्यांना १५ दिवसात निर्णय घ्यावा लागले, असे रोहित पवार म्हणाले.

शरद पवार यांनी विधानसभेची तयारी सुरु केली असून ३० उमेदवार ठरले आहेत. अजित पवार गटाच्या मतदारसंघात काही उमेदवार फायनल देखील झाले. मात्र १८ ते १९ आमदार आमच्या संपर्कात आहेत. यातील किती घ्यायचे हे शरद पवार आणि जयंत पाटील ठरवतील, असे रोहित पवार म्हणाले.

Post a Comment

0 Comments