-->

Ads

Mumbai Crime News: मुंबईतील वरळी येथे धक्कादायक घटना, कारमध्ये २४ वर्षीय तरुणीवर बलात्कार

Mumbai News: मुंबईतील वरळी परिसरात एका एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ठाण्यात राहणाऱ्या एका २४ वर्षीय तरुणीवर कारमध्ये बलात्कार केल्या तक्रार एका स्वयंसेवीठाणे येथील दिघा गाव परिसरात राहणाऱ्या एका २४ वर्षीय तरुणीवर वरळी येथे कारमध्ये बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. नोकरीचे प्रलोभन दाखवून दारूच्या नशेत अत्याचार केल्याचा आरोप तरुणीने केला आहे. याप्रकरणी वरळी पोलिस ठाण्यात एक स्वयंसेवी संस्था चालविणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दिघा गावातील २४ वर्षीय तरुणी नोकरीच्या शोधात होती. तिच्या काही मित्रांना याबाबत माहित होते. जोसेफ नावाचा मित्र नोकरी मिळवून देण्यासाठी मदत करेल असे सांगून दोन मित्रांनी तिला खार येथे बोलावले. या ठिकाणी जोसेफ हा देखील आला होता. एका हॉटेलमध्ये सर्वांनी मद्यपान केले. हॉटेल बंद झाल्यानंतर सर्वजण बाहेर पडले. या तरुणीचे मित्र निघून गेले आणि ती एकटीच खार स्थानकाच्या दिशेने चालली होती. याचवेळी दुचाकीवरून निघालेल्या जोसेफने तिला थांबवले आणि दुचाकीवर बसण्यास सांगितले. उशिरा झाल्याने लोकल बंद झाल्या असतील असे सांगून जोसेफने तिला आपल्यासोबत घेतले.दोघेही दुचाकीवरुन वरळी परिसरात आले आणि या ठिकाणी एका पार्किंग केलेल्या कारमध्ये जोसेफने नेल्याचे तरुणीने तक्रारीत म्हटले आहे. दारूच्या नशेत असल्याचा गैरफायदा घेत जोसेफ याने कारमध्ये बलात्कार केला. विरोध केला असता त्याने मारहाण केल्याचे तिने म्हटले आहे.

सकाळ झाल्यावर जोसेफने याने टॅक्सी करून दिली आणि मला रेल्वे स्थानकावर सोडण्यास सांगितले. कुण्याकडे वाच्यता केल्यास बघून घेण्याची धमकी देखील दिली. तरुणीने रेल्वे स्थानकात न जात टॅक्सी पोलिस ठाण्यात नेली आणि याबाबत तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून जोसेफला अटक केली.


Post a Comment

0 Comments