-->

Ads

भिवंडीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठं खिंडार; अनेक महिला पुरुष पदाधिकारी आणि जिजाऊ संघटनेमध्ये जाहीर प्रवेश

भिवंडी :  २३-भिवंडी लोकसभा मतदार संघातील रोज होत असलेल्या घडामोडी पाहता या निवडणुकीची रंगत अजूनच वाढतांना दिसत आहे. सोमवारी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे भिवंडीतील अनेक महिला व पुरुष पदाधिकारी यांनी निलेश सांबरे यांच्या जिजाऊ संघटना / जिजाऊ विकास पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाला पुन्हा एकदा एक मोठा झटका बसला आहे. तसेच अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांना भिवंडी परिक्षेत्रातून मिळणारा प्रतिसाद हा खूप मोठ्या प्रमाणात वाढतांना दिसत आहे.दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला शहराध्यक्षा शहाजान अन्सारी यांनी जिजाऊ संघटना महाराष्ट्र अध्यक्ष निलेश सांबरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जिजाऊ संघटना / जिजाऊ विकास पार्टीमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर सोमवारी पुन्हा राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी विकासाच्या व परिवर्तनाच्या मुद्द्यावर जिजाऊ संघटना / जिजाऊ विकास पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी जिजाऊ संघटनेच्या भिवंडी लोकसभा अध्यक्षा मोनिका पानवे व पालघर लोकसभा अध्यक्ष महेंद्र ठाकरे यांच्यासमवेत जिजाऊ संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.


जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणारे निलेश सांबरे यांना भिवंडी परिक्षेत्रात असणारा प्रतिसाद हा दिवसेंदिवस वाढतच चालल्याचे चित्र निर्माण झाले आहे. तसेच राष्ट्रवादी शरद पवार गटाला भिवंडीमध्ये खूप मोठे खिंडार पडले असून मविआचे उमेदवार सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे यांना मात्र पक्षांतर्गत कलहाचा खुप मोठा फटका बसला आहे.


राष्ट्रवादी शरद पवार गटाचे भिवंडी शहर उपाध्यक्ष वली हाश्मी, भिवंडी शहर उपाध्यक्षा रेश्मा हैदर अन्सारी, शहर संघटक सबा उमर शेख, शहर उपाध्यक्षा नुरजहा मतलुब अन्सारी, दर्गाह रोड वार्ड अध्यक्षा शबाना रफिक अन्सारी, घुंगटनगर वॉर्ड अध्यक्षा रुखसार रफिक अन्सारी, अमिना बाग वॉर्ड अध्यक्षा हजरा शेख, गुलजारनगर वॉर्ड अध्यक्षा नूरजहा रईस अन्सारी, कारीवली रोड वॉर्ड अध्यक्षा शकीला इकबाल खान, सौदा गाव वॉर्ड अध्यक्षा लाली मंसूरी, भिवंडी शहर सल्लागार हमीदा शब्बीर शेख यांच्यासोबतच अनेक पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यानी जिजाऊ संघटनेमध्ये जाहीर प्रवेश केला.

Post a Comment

0 Comments