-->

Ads

CSK IPL 2024 : चेन्नईची धुरा मराठी माणसाच्या हातात.... धोनी झाला पायउतार, कॅप्टन्सी सोपवली ऋतुराजकडे

Ruturaj Gaikwad new captain for Chennai Super Kings : मोठी बातमी! एमएस धोनीने अचानक कर्णधारपद सोडले असून आता ऋतुराज गायकवाडला चेन्नईचा नवा कर्णधार बनवण्यात आले आहे.

Ruturaj Gaikwad to lead Chennai Super Kings :

मोठी बातमी! एमएस धोनीने अचानक कर्णधारपद सोडले असून आता ऋतुराज गायकवाडला चेन्नईचा नवा कर्णधार बनवण्यात आले आहे. धोनीने गेल्या मोसमात चेन्नईला पाचव्यांदा आयपीएल जिंकून दिले होते आणि आता त्याने संघाची कमान गायकवाड यांच्याकडे सोपवली आहे. आयपीएलने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून ही माहिती दिली.

22 मार्चपासून सुरू होणाऱ्या आयपीएलच्या 17व्या हंगामाचा पहिला सामना शुक्रवारी सीएसकेचा आरसीबीविरुद्ध होणार आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली संघाने गेल्या मोसमात अंतिम सामन्यात गुजरात जायंट्सचा पराभव करून विजेतेपद पटकावले होते.सीएसकेला पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद मिळवून देणारा महेंद्रसिंग धोनी आगामी हंगामात संघाचे नेतृत्व करताना दिसणार नाही. धोनीने ही जबाबदारी सोडण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी आयपीएल 2022 मध्येही संघ व्यवस्थापनाने कर्णधारपदात बदल केले होते.

धोनीच्या जागी स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजाला कर्णधार बनवण्यात आले. मात्र, तो ही जबाबदारी नीट पार पाडू शकला नाही. त्यामुळे त्याने हंगामाच्या मध्यातच संघ सोडला आणि कर्णधारपदाचाही राजीनामा दिला. यानंतर धोनीने पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा सांभाळली. गेल्या मोसमात संघाने पाचवे विजेतेपद पटकावले.आयपीएलने आज सर्व कर्णधार आणि ट्रॉफीसह फोटो ट्विटवर शेअर केला. या फोटोत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या ऐवजी फोटोसेशनला ऋतुराज गायकवाडने उपस्थिती लावली.

टाटा आयपीएल सुरू होत आहे. आम्ही रॉक अँड रोलसाठी सज्ज झालो आहे. सादर करत आहोत 9 कर्णधार पंजाब किंग्जचा उपकर्णधार जितेश शर्मा संघाचं फोटोसाठी प्रतिनिधित्व करत आहे. असे या फोटोला आयपीएलने कॅप्शन दिलं आहे.


Post a Comment

0 Comments