-->

Ads

लाखो रुपयाचे जलशुद्धीकरण यंत्र पडले धुळखात:दिड वर्षा पासुन यंत्र बंद लाखो रुपये पाण्यात?

प्रतिनिधी संजय जाधव यवतमाळ :फुलसावंगी येथील ग्राम पंचायतने लाखो रुपये खर्च करून बसवलेले जलशुद्धीकरण यंत्र मागील दिड वर्षा पासुन धुळखात पडलेले आहे. ग्रामीण भागातील जनतेला पिण्यासाठी शुद्ध व स्वच्छ पाणी मिळावे, या उद्देशाने १४ वित्त आयोगाच्या निधीतून २०१८-१९ मध्ये औरंगाबादच्या एका कंपनी कडून येथील  जलशुद्धीकरण यंत्र बसविण्यात आले होते . या यंत्राच्या माध्यमातून नागरिकांना शुद्ध आणि स्वच्छ पाणी पुरविण्याचा हेतू होता. त्या हेतूलाच आता तडा जात आहे. त्यामुळे येथील नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळणे बंद झाले आहे. या जलशुद्धीकरण यंत्रावर ग्राम पंचायत फुलसावंगीने केलेला लाखो रुपये खर्च पाण्यात गेला आहे असे म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. जनतेच्या कराचा पैसा ग्राम पंचायत ने कसा वापरला हे आता स्पष्ट होत आहे. या जलशुद्धीकरण यंत्रावर झालेल्या खर्चाचा कोणताच उपयोग नागरिकांना होतांना दिसत नाही. 

येथे लाखो रुपयाचा निधी खर्च करुन जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात आला आहे. तो  मात्र केवळ ग्राम पंचायतीच्या उदासीन धोरणामुळे या योजनेला ग्रहण लागुन नागरिक स्वस्त शुध्द पाण्या पासुन वंचीत राहत आहेत. नागरिकांना जे २० लिटर चे जार या जलशुद्धीकरण यंत्रावर पाच रुपयाला मिळत होते तेच जार आता ईतर ठिकाणा वरुन २० रुपयात घ्यावे लागत आहे.नागरिकांना नाईलाजास्तव शुद्ध पाण्यासाठी जादा पैसे मोजावे लागत आहे.
-------****---
▪️ शासनाने बसवलेले जलशुद्धीकरण यंत्र ग्राम पंचायतने लवकर चालू करुन नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करुन द्यावे.

▪️ शैलेश मु.वानखेडे, नागरिक फुलसावंगी




Post a Comment

0 Comments